Kishori Pednekar | ‘देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे नाकारत नाही पण…’; किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar | शिवसेना (Shivsena) दावा करते की आम्ही बाबरी पाडली मात्र वास्तविक तिथे एकही शिवसैनिक नव्हता, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. मुंबईतील भाजपच्या बुस्टर सभेत (BJP Booster Sabha) फडणवीस बोलत होते. यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Kishori Pednekar) प्रत्युत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

बाबरीचा घुमट पडल्यानंतर सगळ्यांची पळता भुई थोडी झाली होती. कोणीही बाबरी पतनाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते.
त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती, असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.
त्यासोबतच शिवसैनिक हे बाबरीच्या पतनावेळी तिथे होते की नाही हे तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व रेकॉर्ड चेक करावेत, असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते,
हे मी नाकारत नाही पण त्यांच्यासोबत शिवसैनिकही तुरुंगात होते ही बाब त्यांनी स्वीकारली पाहिजे.
फडणवीस वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे राजकीय कार्य चांगले आहे. पण ते खोटं बोलून स्वत:ची प्रतिमा मलिन करत असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, मी स्वत: 27 महिलांसह अयोध्येला (Ayodhya) जाण्यासाठी कल्याणमध्ये (Kalyan) गाडीत बसले होते मात्र महिलांनी यायचं नाही असं सांगत आम्हाला उतरावलं होतं त्यामुळे बाबरी पतनाला गेले होते असं खोटं सांगणार नाही, असं पेडणेकरांनी सांगितलं.

 

Web Title :- Kishori Pednekar | shiv sena kishori pednekar replied bjp devendra fadnavis over babri masjid case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा