Kishori Pednekar | पंकजा मुंडेंनी भाजपामधील परिस्थितीला वाचा फोडली, किशोरी पेडणेकरांची टीका, म्हणाल्या – स्वतःच्या बाळाला…

मुंबई : Kishori Pednekar | पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे एक विधान सध्या खुप चर्चेत आहे. या वक्तव्यावरून शिवसेना (Shivsena) आणि इतर विरोधी पक्षांकडून भाजपावर (BJP) टीका केली जात आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही यावरून भाजपावर टीका केली आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी देखील वंशवादाचे प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केले तर मोदींनीही मला संपवायचे ठरवले तरी ते संपवू शकत नाहीत. मात्र, आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले असून माझ्या वक्तव्याचा चुकीची अर्थ काढला आहे, असे म्हटले आहे.

यावरून आता किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले की, पंकजा मुंडेंनी भाजपामधील परिस्थितीला वाचा फोडली आहे. मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही.
कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडील, आजोबा, काका, भाऊ असे सगळे कुटुंबच राजकारणात मुरलेले आहे.
त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून (Gopinath Munde) राजकारणाचे बाळकडू घेतले आहे.

भाजपाला टोला लगावताना पेडणेकर म्हणाल्या, पंकजा मुंडे स्पष्ट आणि कार्यशील महिला आहेत.
त्यांनी त्यांच्या पक्षातील खदखद बोलून दाखवली.
स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचे आणि दुसर्‍याच्या बाळाला मांडीवर घेऊन खाऊ-पिउ घालून गुटगुटीत करण्याचा देशात ट्रेंड दिसतोय. त्याला पंकजा मुंडेंनी वाचा फोडली आहे.

तर आशिष शेलारांवर (Ashish Shelar) टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शब्दांचे फवारे उडवण्यात आशिष शेलार तरबेज आहेत. हिंदूंचे पारंपारिक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.
विदर्भात गरबा होत नाही, भोंडला साजरा होतो. पण राजस्थान, गुजराती, मारवाडी गरबा करतात.
त्यात सगळेच आनंद घेतात. सात्विक भाव कितीही असला, तरी आनंद घेणे महत्त्वाचे आहे.
त्यात तुमचे राजकारण का वळवळतंय. मुद्दाम मळमळतंय, तळमळतंय असं म्हणत आहे.
धौती चूर्ण तुम्हीच घ्या.

मुंबईमधील नवरात्रौत्सवाचा (Navratrotsav) उत्साह पाहून शिवसेनेला होणार्‍या मळमळीवर एकच सल्ला आहे,
धौती योग घ्या ना, अशी टीका आशिष शेलार यांनी ट्विटरवर केली होती.
या टीकेला किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले.

Web Title :- Kishori Pednekar | shivsena kishori pednekar mocks bjp on pankaja munde statement ashish shelar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Asthma | दमा असलेल्या रुग्णांसाठी ‘नवजीन कफ अमृत आणि कुल ब्रीद’ गुणकारी औषध, 100% फरक

Pune MNS | केंद्र सरकारकडून PFI वर बंदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची अमित शहांकडून मागणी पूर्ण, पुण्यात मनसेनं फटाके फोडत वाटले मोतीचूर लाडू (व्हिडिओ)