Kishori Pednekar | भाजपाच्या राम कदमांना शिवसेनेचे रोखठोक प्रत्युत्तर, पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar | पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार. पेंग्विन सेनेची तुम्ही काळजी करू नका, मुंबईत ती उत्तम काम करतेय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लोक धन्यवाद देतात. कारण परदेशात जाऊन जे सुख पाहायला मिळतं, ते मुंबईत पेंग्विनमुळे मिळतं, असे म्हणत शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपाच्या (BJP) राम कदमांना (Ram Kadam) रोखठोक उत्तर दिले आहे.

 

दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीची (NCP) मदत. दसरा मेळावा, काय सत्य… महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते? असे खोचक ट्विट भाजपाचे मुंबईतील नेते राम कदम केले होते. यावर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, तुम्ही काहीही म्हणा… पेंग्विननेच भरभराट केलीय, ती पेंग्विन सेना महाराष्ट्राची आणि मुंबईची भरभराट करणार.

 

शिवसेना आणि शिंदे गटात (Shinde Group) दसरा मेळाव्यावरून मोठी चढाओढ सुरू आहे.
दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी विविध प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहेत.
दरम्यान, काँग्रेसने शिवसेनेकडे एक प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावानुसार शिवसैनिक जर राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील, असे वृत्त सध्या चर्चेत आहे. यावरून आता भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

 

Web Title :- Kishori Pednekar | shivsena kishori pednekar slams bjp ram kadam over dasara melava statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | केवळ अर्ध्या तासात पुणे शहरात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना, एकाचा मृत्यू

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल