Kishori Pednekar | राज ठाकरेंची सभा म्हणजे उत्तर पूजा, ‘आधी भैय्यांसोबत काटाकुटी आता गुलु गुलु’- किशोरी पेडणेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) शिवसेना (Shivsena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये उत्तर सभा आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली आहे.

 

ही कसली उत्तर सभा ? ही तर उत्तर पूजा आहे. आम्हाला त्यात रस नाही. आमच्या कडे ही मुस्लिम पदाधिकारी (Muslim Office Bearers) आहेत. आधी भैय्यांसोबत कुटाकुटी केली आणि आता गुलु गुलु करत आहात, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मनसे जेव्हा स्थापन झाली तेव्हा शिवसेना भवनावर (Shivsena Bhavan) दगडफेक केली. ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) वेदना देणारी मनसे असल्याचंही पेडणेकर म्हणाले. (Kishori Pednekar)

 

शिवतीर्थ (Shivteerth) उभं केलं आहे ना त्यात मंदिर नाही आहे का ? तुम्ही भेदभाव का करत आहात ? एकीकडे भैय्यांबद्दल बोलतात पण तुम्ही तुमच्या झेंड्यात सगळ्यांना आणलं, मात्र भगवा मात्र अगदी छोटा होता. ही शिवसेना प्रमुखाने पावन केलेली जमीन आहे. त्यावर तुम्ही दगडफेक केली. हिंदुत्व मिरवण्याची गोष्ट नाही. हनुमान चालीसा रस्त्यावर कशाला आणला ?,असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेवर मनसे नेते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :-  Kishori Pednekar | shivsena leader kishori pednekar attack mns over raj thackeray rally in thane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा