Kishori Pednekar | ‘कमळातला हा चिखल गेला कुठे?’; किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) आर्थिक अपहार प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सोमय्या यांचा अटकपुर्व जामीन फेटाळण्यात आला असून गेले दोन दिवस सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत. याचाच धागा पकडत शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी किरीट सोम्य्यांवर निशाणा साधला आहे.

 

आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे.
आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं (Babasaheb Ambedkar) संविधान आहे.
त्या संविधानाप्रमाणे (Constitution) आपण लढू.
मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं, असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे.

 

प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता.
आता नॉट रिचेबल का, कमळाचा हा चिखल गेला कुठे ?, अशा शब्दात पेडणेकर यांनी सोमय्यांवर टीका केली.
सोमय्या शिवेसेनेच्या नेत्यांवर आरोप करताना दिसतात मात्र आता आयएनसमुळे विक्रांत प्रकरणामुळे सोमय्या अडचणीत आले आहेत.

 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवरही अनेकवेळा आरोप केले होते.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप, कोविड काळात कोरोना सेंटरमध्ये (Corona Center) झालेला घोटाळा यावरून अनेकदा सोमय्यांनी पेडणेकरांवर टीका केली होती.

 

Web Title :- Kishori Pednekar | shivsena leader kishori pednekar has attacked kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा