‘Kiss Day’च्या दिवशी रेल्वे रूळावर ठवेली ‘मान’ अन् कमरेवर ठेवला ‘हात’, ट्रेन ‘धडधडत’ गेली

चायबासा : वृत्तसंस्था – व्हॅलेंटाईन वीकमध्ये एका प्रेमी युगुलाने मनाचा थरकाप उडवणारे पाऊल उचलले. किस डेच्या दिवशी या प्रेमी युगुलाने ट्रेन समोर झोपून आत्महत्या केली. ही घटना झारखंडमधील चायबासा जिल्ह्यात घडली आहे.

व्हॅलेंटाईन वीकमध्ये या प्रेमी युगुलाने वेदनादायक पाऊल उचलले. एकमेकांना मिठी मारल्यानंतर किस डे च्या दिवशी दोघांचा अतिशय वेदनादायी मृत्यू झाला. प्रेमी युगुलाने रेल्वे रूळावर एकमेकाच्या कमरेत हात घालून रूळावर मान ठेवली. ट्रेन धडधडत निघून जाताच दोघांचे शीर धडापासून वेगळे झाले.

ही घटना चक्रधरपुर स्टेशनच्या ईस्ट केबिनजवळ घडली. घटनास्थळावर रेल्वे पोलीस पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले.

दोघांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

मृत तरूण आणि तरूणी चक्रधरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झरझरा परिसरात राहणारे आहेत. तरूणीचे नाव रायमुनी हांसदा आणि तरूणाचे नाव लखीराम गागराई आहे.