KISS (चुंबन) घेतल्याने होऊ शकतात ‘हे’ 6 आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइऩ – चुंबन घेणे ही गोष्ट केवळ प्रेम, काळजी व्यक्त करण्याचे माध्यम नाही तर त्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण चुंबन घेण्याचे काही प्रमाणात नुकसान देखील आहे. चुंबन घेताना त्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास तुम्हाला माहीत नसेल किंवा याबाबतचा विचारही तुमच्या डोक्यात येत नसेल. पण, तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. चुंबन घेतल्याने तुम्हाला कोणत्या आजाराचा सामना करावा लागू शकतो, हे जाणून घ्या.

1) इन्फ्लुएंझा : इन्फ्लुएंझा हा संसर्गाने होणारा श्वसनाचा आजार आहे. चुंबन, शिंक, खोकला यामुळे या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे नाक, घसा व फुप्फुसे यांना विषाणूंची बाधा होते. थुंकी अथवा लाळेच्या माध्यामातून इन्फ्लुएंझा आजाराचा संसर्गाची भीती आहे. अंग दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि ताप यांसारखी लक्षणे या आजाराची आहेत.

2) परिसर्पः चुंबन घेतल्याने आजाराचा संसर्ग होऊ होतो. तोंडाच्या आत आणि आसपासच्या भागात वेदनादायक फोड किंवा अल्सर या स्वरूपात असतात. जेंव्हा हे फोड ओठांवर किंवा आसपास दिसतात. त्यावेळी त्यांना सामान्यतः थंड फोड म्हणून ओळखले जाते. लोकांना खाज जाणवते, फोड येण्यापूर्वी खोकला किंवा जळजळ होते.

3) सिफिलीसः शारीरिक संपर्काद्वारे हा आजार पसरला जातो. चुंबन अथवा शारीरिक संबधाद्वारे या आजाराचा संसर्ग वाढतो. यात तोंडात फोड येतात. antibiotics द्वारे हा आजार दूर केला जाऊ शकतो.

4) मेंदूच्या वेष्टनाचा दाहः चुंबनाद्वारे Meningitis हा आजार उद्भवू शकतो. मान दुखणे, सतत ताप येणे आणि डोकेदुखीसारख्या आजारांचा या आजाराच्या लक्षणांमध्ये समावेश आहे.

5) श्वसनसंस्थेचे विकारः वातावरणातील बदलांमुळे श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. चुंबनाद्वारे श्वसनासंबधित विकाराचा संसर्ग होऊ शकतो.

6) इन्फेक्टेड व्यक्तीचे चुंबन घेतल्यास हिरड्यांचा आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. ब्रश करणे अन् कोमट पाण्याने गुळण्या केल्यास या आजारापासून दूर राहता येते. तसेच बॅक्टेरियामुळे दाताचे आजारही उद्भवू शकतात. त्यामुळे चुंबनानंतर दात साफ करावेत.