चुंबन घेताना अडकली म्हणून कापलं, पतीनं केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चुंबन घेताना जीभ अडकल्याने नाईलाजाने आपल्या पत्नीची जीभ कापल्याचा दावा अयुब्ब मन्सुरी यांनी करत, धारदार शस्त्राने जबरदस्ती जीभ कापल्याचा आरोप फेटाळला आहे. जखमी महिलेने वेजालपूर पोलीस स्थानकात पती विरोधात या संबंधित तक्रार दाखल केली, हा प्रकार अहमदाबादच्या जुहापूरामध्ये घडला.

चुंबन घेताना जीभ अडकल्यामुळे आपल्याला जीभ कापावी लागली असे अय्युब यांनी पोलिसांना सांगितले, पत्नीच्या तोंडातून रक्त वाहिला लागल्याने आपण घाबरुन बाहेरुन कुलूप लावून पळालो असे चौकशीत अय्युब यांनी सांगितले. यानंतर महिलेल्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जीभ कापल्याने तिच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, परंतू यामुळे महिलेला बोलता देखील येत नाही आणि जेवता देखील येत नाही.

पतीचे झाले होते 2 विवाह –
2004 साली लग्न झाले होते, परंतू पतीबरोबर पटत नसल्याने त्यांना 5 वर्षांपूर्वी तलाक झाला होता. त्यानंतर तिने 24 मार्चला जूहापूरा येथे राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले. त्या व्यक्तीच्या पहिले दोनदा विवाह झाले होते. लग्ननंतर नवरा अजून देखील पहिल्या पत्नी आणि तिच्या मुलाबरोबर राहत होता असे तिला कळाले होते. ही महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे.

पहिल्या पत्नीबरोबर राहत असल्याने पीडित महिलेचा आक्षेप –
पती पहिल्या पत्नीबरोबर राहत असल्याने पीडित महिलेने त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे पतीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेने सांगितले की नवरा काहीच काम करत नसल्यामुळे मी त्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची, व्यवसाय सुरु करण्याची विनंती केली. मी सतत नोकरी कर असे सांगत असल्याने तो मला सतत मारहाण करायचा, मागच्या आठवडयात मी त्याला पैसे द्यायला नकार दिल्यानंतर देखील पतीने मला मारहाण केली परंतू त्यानंतर आमच्यात सर्वकाही ठीक झाले.

महिलेने आपल्या तक्रारीत म्हणले आहे की नवऱ्याने रात्री 11 च्या सुमारास मला जवळ घेतले आणि चुंबन घेऊ लागला, परंतू मला काही समजायाच्या आता त्याने माझी जीभ कापली. त्यानंतर तो बाहेरुन लॉक लावून पळून केला. महिलेने तिच्या बहिणीला व्हिडिओ कॉल करुन देखील परिस्थिती कळवली. बहिणीने तेथे पोहचून शेजारच्यांकडून दुसरी चावी घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी