Kitchen Gardening Tips | घरात बनवायचे असेल ‘किचन गार्डन’, पावसाळ्यात सहज उगवा 6 सुगंधी रोपे, वर्षभर स्वयंपाकासाठी पडतील उपयोगी

नवी दिल्ली : Kitchen Gardening Tips | स्वतःचे किचन गार्डन बनवण्याचा विचार करत असाल तर पावसाळ्याचा हंगाम त्यासाठी योग्य आहे. किचन गार्डनमध्ये तुम्ही अशा वनस्पती वाढवू शकता ज्यांच्या सुगंधामुळे पदार्थांची चव वाढेल. तसेच वर्षभर पैसे खर्चुन या वनस्पती आणाव्या लगणार नाहीत. किचन गार्डनमध्ये कोणत्या वनस्पती लावू शकता ते जाणून घेऊया (Kitchen Gardening Tips).

किचन गार्डनमध्ये लावा ही रोपे

कढीपत्ता

पावसाळ्यात कढीपत्ता लावू शकता आणि कढीपत्त्याचा वापर स्वयंपाकासाठी करू शकता. त्याचे कलम लावू शकता अथवा बिया टाकून भांड्यात लावू शकता. (Kitchen Gardening Tips)

पुदिना

पुदिना जेवणाची चव वाढवतो, तसेच त्यापासून विविध ड्रिंक आणि चटण्या बनवू शकता. तो आरोग्यासाठी लाभदायक आहे. पावसाळ्यात पुदिन्याची फांदी भांड्यात माती टाकून लावा, तो वर्षभर हिरवागार राहतो.

तुळस

तुळस औषधी वनस्पती असून पावसाळ्यात एकदा मातीत लावली की वर्षभर हिरवीगार राहते. तिची पाने पास्ता, मॅकरोनी इत्यादी बनवण्यासाठी वापरू शकता.

गवती चहा

गवती चहा सुद्धा तुम्ही सहजपणे किचन गार्डनमध्ये लावू शकता. त्याची ताजी पाने चहासोबत उकळून प्यायल्यास आरोग्याला फायदे होतात. सकाळ ताजीतवानी होते.

कोथिंबीर

कोथिंबीरीचा वापर स्वयंपाकघरात भरपूर केला जातो. किचन गार्डनमध्ये ती लावण्यासाठी धणे हलकेच चिरडून घ्या.
त्याचे अर्धे-अर्धे भाग वेगळे झाल्यावर भांड्यातील मातीत किमान अर्धा इंच आत टाका. काही दिवसांतच कोथिंबीर येईल.

हिरवी मिरची

हिरवी मिरचीही घरात सहज लावू शकता. त्यासाठी कुंडीत मातीमध्ये सुक्या मिरचीच्या आतील बिया टाका.
आणि रोज पाणी घाला. काही दिवसांत रोपे येतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा : बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ