Corona Bhajan : ‘मैया जी.. कित्थों आया कोरोना’ व्हायरस वर भजनाचा Video व्हायरल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक कोरोना व्हायरसमुळे घाबरलेले आहेत आणि याच्यापासून दूर राहण्याचा प्रत्येक प्रयत्न ते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील सर्वच नेते या व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी प्रार्थना आणि भजनाने मनोबल वाढविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. सध्या कोरोना व्हायरसशी संबंधित एक भजन व्हायरल होत आहे.

नवी दिल्लीच्या पहाडगंजमध्ये होळीच्या कार्यक्रमात भजन गायक नरेंद्र चंचल यांचा रेकॉर्ड करण्यात आलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. होली के रंग, मां झंडेवाली के संग हा कार्यक्रम 9 मार्चला आयोजित करण्यात आला होता. कॉमेडियन आणि लेखक, मल्लिका दुआ यांनी हा व्हिडिओ कॅपशनसह शेयर केला आहे. त्यांनी लिहिले आहे- ओ कित्थों आया कोरोना? जगराता इलाज से बेहतर है.

क्लिपमध्ये, भजन गायक चंचल गात आहेत…डेंगू भी आया, स्वाइनफ्लू भी आया, चिकनगुनिया ने शोर मचाया, कित्थों आया कोरोना। मैया जी, किथो आया कोरोना?

या व्हिडिओबाबत आश्चर्याची गोष्ट ही आहे की, लोकांचा एक मोठा गट नरेंद्र चंचल यांचे हे गीत गुणगुणत बसल्याचे दिसत आहे. सध्या सरकारने या आजारापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना व्हायरसवरील या भजनावर विविध प्रतिक्रिया इंटरनेटवर येत आहेत. अनेक लोकांना हा व्हिडिओ मजेशीर वाटला तर काहींनी त्यावर टीका केली तर काही लोकांनी अशाप्रकारे लोकांनी एकत्र जमणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

भारतात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढून 107 झाली आहे. तर रूग्णांचा मृत्यू झाला आहे.