Beauty Tips : त्वचा तेलकट असो वा कोरडी, त्वचेनुसार ‘असे’ तयार करा ‘किवी’चे विविध फेस पॅक !

जर तुम्ही किवीचा वापर त्वचेसाठी केला तर यामुळं अँटीएजिंगची लक्षणं दूर होतात. यात असणाऱ्या व्हिटॅमिन ई मुळं त्वचा तजेलदार होते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आहे. याचा त्वचेसाठी खूप फायदा होतो. आज आपण किवीच्या फेसपॅकबद्दल माहिती घेणार आहोत. चेहरा आणि त्वचेच्या विविध समस्यांसाठी याचा कसा वापर केला जातो हे आपण जाणून घेणार आहोत.

तुमच्या त्वचेच्या समस्येनुसार असा तयार करा किवीचा फेसपॅक

1) तेलकट त्वचा – अशा लोकांनी किवी आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक लावावा. यामुळं जास्त फायदा होईल. यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा किवी पल्प घ्या. याचं चांगलं मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण चेहरा आणि गळ्याला लावा.

2) कोरडी त्वचा – ही समस्या असणाऱ्यांसाठी किवी, केळी आणि दही यांचा फेसपॅक जास्त फायदेशीर ठरतो. यामुळं त्वचा उजळण्यासही मदत होते. एका भांड्यात किवी पल्प घ्या. यानंतर मॅश केलेलं केळ आणि एक चमचा दही घ्या. या तिन्ही पदार्थांचं चांगलं मिश्रण तयार करा. हे मिश्रण 30 मिनिटांनंतर चेहरा आणि गळ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ करून घ्या.

3) चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी – एका भांड्यात किवी पल्प आणि बदामाची पेस्ट घ्या. यात थोड्या प्रमाणात बेसन मिक्स करा. चांगलं मिश्रण तयार केल्यानंतर हे आपल्या चेहऱ्याला आणि गळ्याला लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या.

4) चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या आणि अॅक्ने – या समस्या दूर करण्यासाठी किवीला ऑलिव्ह ऑईल आणि अंड्यात मिक्स करा. यामुळं तुमची त्वचा डल राहणार नाही. एका भांड्यात किवी पल्प, अंड्याचा बलक आणि ऑलिव्ह ऑईल घ्या आणि चांगलं मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

5) निस्तेज त्वचा ताजीतवानी करा – जर तुम्हाला निस्तेज त्वचा ताजीतवानी करायची असेल तर किवीचा फेसपॅक जास्त फायद्याचा ठरतो. यासाठी किवी आणि ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात घ्या. दोन्हींचं चांगलं मिश्रण तयार करा. त्यानंतर चेहऱ्याला आणि गळ्याला लावा. आपल्या बोटांनी हळूवार मसाज करा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.