तरुण-चमकदार त्वचा हवीय ? चेहऱ्याच्या विविध समस्यांसाठी ‘किवी’चे ‘हे’ 5 खास FacePack !

पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्ही किवी या फळाचा त्वचेसाठी वापर केला तर तुमची त्चचा जास्त तरुण आणि चमकदार दिसेल. यामुळं अँटी एजिंगची लक्षणंही दूर होतात. काळे डाग सुरकुत्याही नाहीशा होतात. पिपंल्स, ॲक्ने या समस्याही दूर होतात. यासाठी तुम्हाला किवीचे विविध फेसफॅक वापरावे लागतील. कोणत्या समस्येसाठी किवीचा कोणता फेसपॅक लावायचा आणि तो कसा करायचा याची माहिती आज आपण घेणार आहोत.

1) तेलकट त्वचा – यासाठी लिंबाचा रस आणि किवीचा फेसपॅक वापरावा.
– 1 चमचा लिंबाचा रस घ्या
– 1 चमचा किवी पल्प घ्या
– आता हे मिश्रण चांगलं मिक्स करा.
– हे मिश्रण 20 ते 30 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला आणि गळ्याला लावा
– सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.

2) कोरडी त्वचा – यासाठी तुम्हाला किवी, केळी आणि दही यांचा फेसपॅक लावायचा आहे.
– एका भांड्यात किवी पल्प घ्या
– यात मॅश केलेली केळी टाका
– आता यात 1 चमचा दही घ्या
– या तिन्हींचं चांगलं मिश्रण तयार करा.
– हे मिश्रण 30 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला आणि गळ्याला लावा
– सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.

3) फ्रेश चेहऱ्यासाठी –
– एका भांड्यात किवी पल्प आणि बदाम पेस्ट घ्या
– यात काही प्रमाणात किंवा गरजेनुसार बेसन मिक्स करा
– तयार मिश्रण चेहरा आणि गळ्याला लावा.
– 15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या

4) चेहऱ्यावरी काळे डाग, सुरकुत्या आणि अॅक्ने –
– एका भांड्यात किवीचा पल्प घ्या
– यात अंड्याचा बलक टाका
– यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.
– हे मिश्रण नीट एकत्र करा.
– आता तयार मिश्रण चेहऱ्याला लावा.
– 15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या

5) निस्तेज त्वचेसाठी –
– किवी पल्प एका भांड्यात घ्या
– यात ऑलिव्ह ऑईल घ्या
– यांचं चांगलं मिश्रण तयार करा.
– तयार मिश्रण चेहरा आणि गळ्याला लावा
– नंतर चेहरा आणि गळ्यावर बोटांनी हळूहळू मसाज करा.
– यानंतर काही वेळ हा पॅक ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.