जाणून घ्या, ‘या’ 5 आजारांना दूर ठेवतंय ‘किवी’, प्लेटलेट्स वाढवतं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   किवी या फळाचे अनेक लाभ आहेत. आजारी रुग्णाला आणि कमी प्लेटलेट्स असणार्‍यांना तर किवी फळ खाण्याचा सल्ला डॉक्टर्स आवार्जुन देत असल्याचे आपणाला माहित असेल. मात्र, हेच किवी फळ आणखी काही आजारांना दूर ठेवतं, हे देखील त्याचं महत्व आहे.

पावसाळ्या ऋतुत शरीराच्या कमजोर प्रतिकारशक्तीला उत्तम ठेवण्यासाठी किवी हे फळ फायदेशीर आहे. किवीमध्ये अनेक पौष्टिक द्रव्ये आहेत. हे असे फळ पावसाळ्यात होणार्‍या अनेक आजारांपासून वाचवू शकते. पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असतो, अशावेळी जर शरीराला सर्वच पोषक द्रव्ये एकत्र मिळाले तर, उत्तमच. किवी असेच फळ असून त्यासारखं उत्तम असं दुसरं फळ नाही, असे म्हंटलं जातं. काही डॉक्टरसुद्धा पावसाळ्यात किवी फळ खाण्याचा सल्ला न चुकता देतात. डॉ. अप्रतीमा गोयल यांनी सांगितलं की, चेहर्‍यावरील सुरुकुत्या कमी करण्यासाठीही या कीवीचा उपयोग होतो.

किवी प्लेटलेट्स वाढवते

किवी खाल्याने शरीरातील रक्तामध्ये घटणार्‍या प्लेटलेट्स लवकर वाढवतात. पावसाळ्यामध्ये डेंग्यूसारखा संसर्गजन्य आजार पसरतो. डेंग्यूमध्ये रुगांच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने कमी होतात. अशा परिस्थितीत किवी खाणे फायदेशीर आहे.

किवीमुळे पचन प्रक्रिया सुधारते

पावसाळ्यामध्ये अनेक कारणांनी पचनाच्या तक्रारी वाढतात. त्यासाठी किवी फळाचा रस घेणे फायदेशीर आहे. किवीमधील तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुधारतात अन् त्याने पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. ज्या लोकांना वात, अपचन, बद्धकोष्ठता या समस्या आहेत, त्यांनी किवीचा रस दररोज प्यायला हवा.

किवी अस्थमाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय

किवीचा रस जर अस्थमाच्या रुग्णांनी घेतला तर त्यांना त्याचा सगळ्यात जास्त लाभ होतो. अस्थमामध्ये श्वसन क्रिया सुरळीतपणे काम करण्यासाठी किवीमध्ये असलेले गुण फायदेशीर आहेत. फुफ्फुसांशी संबंधित अन्य आजारांमध्येदेखील किवी फळ अतिशय उपयुक्त आहे.

किवीमुळे वाढते प्रतिकारशक्ती

कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात शरीराची रोग प्रतिकारशक्ती उत्तम राखणे गरजेचे आहे. हि प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्याचं काम किवी फळ करतं. याचा रस रोगप्रतिकारक पेशींना सक्षम ठेवतो तसेच प्रतिकारशक्तीला आणगी मजबूत बनवतो. किवीमध्ये एक टक्का लोह असल्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं. गर्भवती महिलांनी या फळाचं सेवन केले पाहिजे, असे डॉक्टर सांगत असतात.

रक्तवाहिन्यातील रक्तदाब कमी करते

अयोग्य दिनक्रम तसेच अनेक कारणांमुळे एका विशिष्ट वयानंतर अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तवाहिन्यांत निर्माण होणारे अडथळे आणि वाढलेले कोलेक्ट्रोल हे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहेत. किवीत मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने ते उच्च रक्तदाबाची समस्या कमी करते.

डोळे चांगले ठेवते

किवी फळाचा रस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. तसेच दृष्टी जाण्याच्या समस्येपासून बचावता येते. आजकाल लोकांना अनेक तास संगणकावर आणि मोबाइलवर काम करावे लागते. त्यामुळे दृष्टी कमजोर होण्याचा धोका अधिक असतो. त्यांनी दररोज किवी फळ खावे. किवी हे सी आणि ए या जीवनसत्वचा मुख्य स्त्रोत आहे.