जबरदस्त गुणांनी युक्त आहे ‘किवी’, कमी कॅलरीजमध्ये शरीराला करत मजबूत ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – किवी हे फळं मूळचं चीनमधील आहे. न्युझिलंडचा राष्ट्रीय पक्षी किवीच्या तपकिरी रंगाशी साम्य असल्यानं या फळाचं नाव किवी ठेवण्यात आलं आहे. न्युझिलंड, फ्रान्स, इटली, जपान आणि अमेरिकेत या फळांची जास्त लागवड होते. आता भारतातील उत्तर व ईशान्येकडील राज्यात याची लागवड करून निर्यात देखील केली जाते. साधारण ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान किवीचा हंगाम असतो. हे फळ लहान आणि अंडाकृती असतं. थोडंसं गोड, आंबट, आम्लयुक्त अशी याची चव असते. यात काळ्या रंगाच्या खाण्यायोग्य बिया असतात. आज आपण याचे फायदे जाणून घेणार आहोत. याशिवाय कुणी हे फळं खाऊ नये याचीही माहिती घेणार आहोत.

1) किवीमध्ये क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

2) यामुळं शरीरातील कमकुवत पेशीही यामुळं मजबूत होतात. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

3) संधिवात, आमवात, दमा अशा रोगांवर किवी हे फळ गुणकारी ठरते.

4) या फळात तंतुचं प्रमाण जास्त असल्यानं मधुमेहींसाठी याचा फायदा होतो.

5)किवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्ट्रॉलच प्रमाण अधिक असणाऱ्या आणि हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.

6) यात पाणी आणि पोटॅशियम जास्त असल्यानं जर लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असेल तर किवीमुळं आराम मिळतो.

7) यात क जीवसत्व असतं. जर या फळाचा गर चटका लागलेल्या भागावर लावला तर जखम लवकर भरून निघते.

8) पचनक्रिया नीट होण्यासही याचा खूप फायदा होतो.

कुणी खाऊ नये किवी ?
– पित्ताशय आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार असलेल्यांनी किवीचं सेवन टाळावं.

– काही लोकांना किवीची ॲलर्जी असते ज्यामुळं तोंडाला खाज येते. अशांनीही किवीचं सेवन करू नये.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.