केएल राहुलनं रचला इतिहास, ‘हा’ मोठा ‘कारनामा’ करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज

ऑकलँड : वृत्तसंस्था – टीम इंडियाने न्युझीलंडविरुद्ध टी 20 सामन्यात ऐतिहासिक खेळी करत दुसरा टी 20 सामना जिंकला आहे. भारताने न्यूझीलंडला 7 विकेट्सने हरवत सलग दुसरा विजय प्राप्त केला आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केएल राहुल पुन्हा एकदा टीम इंडियाचा संकटमोचक ठरला. त्याने श्रेयस अय्यर सोबत संघाला विजय मिळवून दिला. या दरम्यान केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या सामन्यात देखील त्याने अर्धशतक केले होते आणि विराट कोहली सोबत त्याने संघाला सावरले होते. न्युझीलंडच्या आजच्या सामन्यात केएल राहुलने अर्धशतक झळकवताच एक इतिहास रचला आहे.

न्युझीलंडने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर केएल राहुलनं श्रेयस अय्यरच्या साथीने टीम इंडियाचा डाव सावरला या दोघांनी संयमी खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. केएल राहुलनं आणखी एक अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यरने 33 चेंडूत 1 चौकार 3 षटकार खेचून 44 धावा केल्या. तर केएल राहुल 50 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावांवर नाबाद राहिला.

मागील पाच टी -20 सामन्यात राहुलने 91, 45, 54, 56, 57 धावा केल्या आहेत. राहुलकडे या मालिकेत कर्णधार कोहलीनं यष्टिरक्षकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आणि त्यातही तो यशस्वी झाला. पण, यष्टीरक्षक म्हणून पहिल्या दोन टी -20 सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. त्याने पहिल्या सामन्यात 56 धावा केल्या होत्या.

फेसबुक पेज लाईक करा –