KL राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल ! पु्न्हा चर्चेला उधाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियातील स्टायलिश क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (K. L. Rahul) हा बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty) याची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोबतच्या नात्यामुळं आणि फोटोंमुळं अनेकदा चर्चेत आला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरची चर्चाही सुरू आहे. दोघांनीही अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही. असं असलं तरी त्यांच्या पोस्ट मात्र सोशलवर समोर येताना दिसत असतात ज्यामुळं चर्चांना अजून हवा मिळते. पुन्हा एकदा असंच काही झालं आहे. त्यांचा एक फोटो समोर आला आहे ज्यानंतर आता अत्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.

राहुल आणि अथिया यांचा लॉनवरील एक फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत दोघंही डिनर करताना दिसत आहेत. या फोटोत या दोघांसोबत इतरही मंडळी दिसत आहेत. रॉबिन उथप्पा आणि त्याची पत्नी शीतल हेही त्यांच्यासोबत डिनर करताना दिसत आहेत. रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल हिनं राहुल-अथिया सोबतचा फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोमुळं आता त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिरो या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अथिया काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मोतीचूर चकनाचूर सिनेमात दिसली होती. हा सिनेमा खास काही चालला नाही. तिनं मुबारकां, नवाबजादे या सिनेमातही काम केलं आहे.