KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी-के.एल राहुलने लग्नाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
272
KL Rahul-Athiya Shetty Wedding | athiya shetty and k l rahul applies no phone policy for their wedding
file photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – KL Rahul-Athiya Shetty Wedding | अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी, अभिनेत्री अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल हे सोमवारी लग्नबंधनात अडकणार आहेत. कालच यांच्या मेहंदी, हळद यांसारख्या लग्नापूर्वीच्या सर्व समारंभांना सुरुवात झाली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर हे लग्न होणार आहे. त्यांच्या बंगल्याचे आणि बंगल्याला केलेल्या डेकोरेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा आहे. (KL Rahul-Athiya Shetty Wedding)

 

अथिया आणि राहुल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. अखेर उद्या म्हणजे 23 जानेवारी रोजी ते पती-पत्नी होणार आहे. हा लग्नसोहळा अगदी खाजगी पद्धतीने होणार आहे. या लग्नात अथिया आणि राहुल यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार असे फक्त शंभरच जण उपस्थित राहतील असं समोर आलं होतं. तर आता या लग्नात उपस्थित राहणाऱ्यांना एक महत्वाचा नियम पाळावा लागणार आहे. (KL Rahul-Athiya Shetty Wedding)

 

विकी-कतरीना, आलिया-रणबीर या सेलिब्रिटींप्रमाणेच अथिया आणि केएल राहुलनेही पाहुण्यांना ‘नो फोन’ पॉलिसीचं पालन करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होणार नाहीत. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे मोबाईल फोन ते लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच काढून घेतले जातील. त्यांना या लग्न सोहळ्याचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करण्यावर बंदी असेल, असंही बोललं जात आहे. या लग्नाला जॅकी श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार, एम. एस. धोनी, विराट कोहली हे सेलिब्रिटी आणि क्रिकेटर हजेरी लावणार असल्याचं कळतंय.

 

Web Title :- KL Rahul-Athiya Shetty Wedding | athiya shetty and k l rahul applies no phone policy for their wedding

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान