KL Rahul-Athiya Shetty Wedding | लग्नाची तारीख विचारताच अथिया शेट्टीने दिली हि रिअॅक्शन; Video व्हायरल
पोलीसनामा ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul-Athiya Shetty Wedding) लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हा विवाहसोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर केएल राहुलच्या घराबाहेरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केएल राहुल आणि अथिया (KL Rahul-Athiya Shetty Wedding) यांचे लग्न या वर्षातील पहिले सेलिब्रिटी वेडिंग आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या लग्नाकडे लागले आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केएल राहुलच्या घराबाहेरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वांद्रे येथील पाली हिल्स परिसरातील केएल राहुलचे घर दाखवण्यात आले आहे. या घराबाहेर डेकोरेशन करण्यात आले आहे. तसेच रोशनाई करण्यात आली आहे. राहुल-अथियाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल दोन्ही कुटुंबांनी किंवा स्वतः अथिया-राहुलने (KL Rahul-Athiya Shetty Wedding) खुलासा केलेला नाही. अशातच राहुलच्या घराची सजावट पाहून दोघांचं लवकरच लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय.
याच सर्व चर्चांदरम्यान अथिया शेट्टी मुंबईतील एका सलूनबाहेर दिसली.
त्याठिकाणी तिला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं.
लग्न कधी आहे, असं विचारताच अथिया लाजली आणि गाडीत बसून निघून गेली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल व अथिया 23 जानेवारी रोजी खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये
लग्नबंधनात अडकतील. दोघांच्या लग्नात मित्र-मैत्रिणी आणि मोजकेच नातेवाईक उपस्थित असतील.
या लग्नाची तयारी खंडाळा येथील फार्म हाऊसमध्येही सुरू असल्याचं म्हटलं जातंय.
राहुल-अथिया एकमेकांना 2018 पासून डेट करत आहेत.
अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर ती मुबारकां आणि मोतीचूर चकनाचूर या दोन चित्रपटांमध्येच झळकली.
अथिया लवकरच फुटबॉलपटू अफशान आशिकचा बायोपिक ‘होप सोलो’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Web Title :- KL Rahul-Athiya Shetty Wedding | athiya shetty blushes on question of wedding with kl rahul she spotted at salon
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार
Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलला २८ लाखांना गंडा घालणार्या मॅनेजरला अटक
Pune PMC News | कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दहा दिवस बंद राहणार