KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी – के. एल. राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी व टीम इंडियाचा स्टार फलंदाज के. एल. राहुल (KL Rahul-Athiya Shetty Wedding) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. अथियाचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर दोघांचं लग्न होणार आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून 21 जानेवारीपासून या फार्महाऊसवर लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. यादरम्यान काल 22 जानेवारी रविवारी केएल राहुल आणि अथियाच्या (KL Rahul-Athiya Shetty Wedding) संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी यांचा फार्महाऊस लग्नासाठी सजवण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. तर मोठमोठ्याने गाणीही वाजवली जात आहेत. या कार्यक्रमात ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यावर पाहुण्यांनी ठेका धरला.

Advt.

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांचे रिलेशनशिप मागच्या काही वर्षांपासून चर्चेत होते. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं. अलीकडे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. अखेर आज तो लग्नाचा दिवस आलाय.
आता दोघांच्याही घरात लगीन घाई होत असल्याचं दिसून येतंय.
आज 23 जानेवारीला दोघांचं लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे .

रविवारी सुनील शेट्टीने माध्यमांसमोर येत मुलीच्या लग्नाविषयी माहिती दिली होती.
त्याचप्रमाणे लग्नानंतर (KL Rahul-Athiya Shetty Wedding) अथिया आणि राहुल माध्यमांसमोर
येऊन फोटोसाठी पोझ देतील, असंही त्यांनी सांगितलं. “उद्या (सोमवारी) मुलांना घेऊन येईन.
खूप खूप धन्यवाद”, असं सुनील शेट्टी म्हणाले.

Web Title :-KL Rahul-Athiya Shetty Wedding | athiya shetty kl rahul sangeet ceremony video viral from khandala farm house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल