KL Rahul – Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तारीख आली समोर ; ‘या’ ठिकाणी पार पडणार लग्न समारंभ

पोलीसनामा ऑनलाइन : KL Rahul – Athiya Shetty Wedding | सध्या क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्याच लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या दोघांच्या रिलेशन बद्दल कळाल्यानंतर हे दोघे कधी लग्न करणार असा प्रश्न चाहते वेळोवेळी त्यांना विचारत होते. आता त्या प्रश्नांना पूर्णविराम देत आता हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत याची तारीख देखील त्यांनी जाहीर केली आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे जानेवारी 2023 च्या शेवटच्या आठवड्यात लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या लग्न सोहळ्यात केवळ कौटुंबिक सदस्य आणि मित्रपरिवार असण्याची शक्यता आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील ‘जहाँ’ या घरात हे लग्न समारंभ पार पाडणार आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल च्या लग्नाचे सर्व कार्यक्रम 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहेत.

लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लगीनघाई सुरू झाल्याची दिसत आहे.
चाहते देखील या दोघांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे पाहण्यात आले आहे.
लोकप्रिय कपलच्या यादीमध्ये अथिया आणि केएल राहुलचे नाव देखील असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांसोबत चे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात.
आता यांच्या लग्नाची तारीख समोर आल्याने चाहते फारच उत्सुक झाल्याचे दिसत आहेत.

Web Title :- KL Rahul – Athiya Shetty Wedding | athiya shetty kl rahul wedding date update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Patan Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी