वर्ल्डकपआधी भारताचा ‘हा’ डॅशिंग खेळाडू आलिया भटच्या ‘या’ बेस्ट फ्रेंडला करतोय ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषकाची रंगत यंदा वाढली आहे. भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. त्यात नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपली खेळातील चमक दाखवली आहे. बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात के एल राहुलने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीने तो पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र फलंदाजीसह त्याच्याविषयी अजूनही काही गोष्टींची चर्चा होत आहे.

राहुल एका मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ही मुलगी म्हणजे अभिनेत्री आलीया भटची बालमैत्रिण आकांक्षा रंजन कपूर ही आहे. आलीया आणि आकांक्षा जीवलग मैत्रिणी आहेत. तर बॉलिवूड आणि क्रिककेटचे नाते जुने आहेच. आकांक्षा ही एक मॉडेल आहे. नुकतेच अभिनेता अपरीक्षित खुराना सोबत एका गाण्यांच्या व्हिडियोतून पदार्पण केले. सध्या मात्र सोशल मीडियावर आकांक्षा आणि राहुलच्या नावाची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी आकांक्षानं राहुलसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला होता. या फोटोनंतर दोघांच्या डेट करण्याच्या चर्चांना उधान आले. या फोटोमध्ये सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीही आहे. फक्त फोटोच पोस्ट करणं नाही तर हे दोघे एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करत असतात. लाईक करत असतात.

दरम्यान, राहुल कॉफी विथ करण कार्यक्रमामुळे मागे चर्चेत आला होता. महिलांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून त्याला ट्रोलही करण्यात आले होते. तसंच राहुलचे नाव यापूर्वी अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्यासोबत जोडले जात होते. तर, आकांक्षा अविक चॅटर्जी नावाच्या व्यवसायिकासोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र राहुल आणि आकांक्षा यांच्या नेमक काय आहे, हे वेळच ठरवेल. सध्या आकांक्षा राहुलला चिअर करण्यासाठी विश्वचषकात उपस्थिती लावते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

View this post on Instagram

…n i’m so good with that 💛

A post shared by 🦋Kanch (@akansharanjankapoor) on

View this post on Instagram

Out tomorrow! #TereDoNaina 💗

A post shared by 🦋Kanch (@akansharanjankapoor) on

 

You might also like