KL Rahul Made History | केएल राहुलनं सचिन अन् सेहवागला मागं टाकत रचला इतिहास, जाणून घ्या नेमकं काय केलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – KL Rahul Made History | लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) सामन्यात लखनऊने विजय मिळवला आहे. मुंबईवर 18 धावांनी धमाकेदार विजय मिळवत दोन गुणांची कमाई केली आहे. या सामन्यात शतक ठोकणारा कर्णधार के. एल. राहुलने नाबाद 103 धावांची खेळी करत अनेक विक्रम (KL Rahul Record) आपल्या नावावर केले आहेत. (KL Rahul Made History)

 

आयपीएलच्या 100 सामन्यात 100 धावा काढणारा राहुल (KL Rahul Record) हा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 100 व्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम हा फाफ डू प्लेसिसच्या (Faf du Plessis) नावावर होता. 2021 मध्ये फाफ ने 86 धावा काढल्या होत्या मात्र आता भारतीय खेळाडू के. एल. राहुलच्या नावावर झाला आहे.

 

कर्णधार म्हणून आयपीएलच्या इतिहासात दोन किंवा त्यापेक्षा जास्त शतक करणारा के. एल. दुसरा कर्णधार ठरला आहे.
पहिल्या स्थानावर विराट कोहली असून त्याने कर्णधार असताना 5 शतके ठोकली आहेत.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांनी कर्णधार म्हणून एक शतक मारलं आहे. (KL Rahul Made History)

 

दरम्यान, के. एल. चे मुंबईविरूद्ध हे दुसरं शतक आहे. याआधी त्याने 2019 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 64 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या होत्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध (Royal Challengers Bangalore) राहुलने 2020 मध्ये 69 धावांमध्ये 132 धावा केल्या होत्या.
आजच्या सामन्यात मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. मुंबईसाठी आता मोठी चिंता वाढली आहे.

 

Web Title :- KL Rahul Made History | ipl 2022 kl rahul kl rahul made history sachin tendulkar sehwag left behind

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा