शिखर धवनमुळं विराट कोहली ‘या’ खेळाडूच करियर आणतोय धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि विंडीज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना उद्या खेळविण्यात येणार आहे. या मालिकेत भारत विजयासाठी मैदानात उतरणार आहे तर सलामीवीर शिखर धवन हा सलग चार सामन्यांत अपयशी ठरला तरी त्याला सतत संधी मिळाली आहे. मात्र त्याने आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली नसून त्याच्याकडे हि शेवटची संधी असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत देखील त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. या मालिकेतील तीन सामन्यात त्याला अनुक्रमे १, २३ आणि ३ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे आता उद्या जर तो अपयशी ठरला तर त्याच्यासाठी हि शेवटची संधी असणार आहे.

धवनमुळे राहुलला संधी नाही
सलामीला शिखर धवन खेळत असल्यामुळे के.एल. राहुल याला मोठ्या प्रमाणात संधी मिळत नसून त्याला त्याची योग्यता यामुळे सिद्ध करता येत नाही. वर्ल्डकपमध्ये देखील त्याला संधी देण्यात आली मात्र सुरुवातीच्या दोन सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. मात्र शिखर धवन जखमी झाल्याने त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. या स्पर्धेत त्याने रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यानंतर सर्वात जास्त धावा त्याने केल्या. मात्र तरीदेखील या मालिकेत त्याला बाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनाला त्याच्या या कामगिरीकडे लक्ष देऊन त्याला संधी द्यावीच लागणार आहे. मात्र उद्या होणाऱ्या शेवटच्या सामन्यात देखील त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. शिखर धवन सध्या ३३ वर्षांचा असून राहुल याचे वय २७ असून पुढील वर्षी वर्ल्डकपच्या दृष्टीने विचार करायचा असल्यास धवनऐवजी राहुलला जास्त संधी मिळायला हवी.

आयपीएलमध्ये देखील धवनच्या पुढे
के. एल. राहुल हा आयपीएलमध्ये देखील धावांच्या बाबतीत धवनच्या पुढे असून मागील २ पर्वात सर्वात अधिक धावा बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांत ५३. ९० च्या ५९३ धावा केल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता. तर २०१८ मध्ये ६५९ धावा केल्या होत्या. त्यामुळे बेरीज केली तर त्याने मागील २ पर्वात २८ सामन्यांत १२५२ धावा केल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like