केएल राहुल चे टीकाकारांना चोख उत्तर, विजय हजारे करंडकात ‘तुफानी’ शतकी कामगिरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केएल राहुल एक अतिशय प्रतिभावान फलंदाज आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून तो आपल्या कौशल्यानुसार खेळ करु शकला नाही. तो क्रिकेटच्या मैदानावर खूपच जे आकर्षक शॉट्स खेळतो त्या त्याच्या चमकदार शॉट्सच मधूनच त्याची क्षमता दिसून येते. सौरव गांगुलीपासून ते कपिल देवपर्यंत अनेकांनी त्याचे औतुक केले आहे परंतु आतापर्यंत तो त्याच्या कौशल्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही.

अनेक मालिकांपासून सातत्याने फ्लॉप :
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या ९ डावात केएल राहुलला एकही अर्धशतक करता आले नाही. तथापि, त्याने शेवटच्या डावात शतक झळकावले, पण त्याशिवाय त्याला काही खास कामगिरी करता आलेली नव्हती. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यादरम्यान तो कसोटी क्रिकेटमध्येही फ्लॉप ठरला होता. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दौर्‍याची कसोटी मालिकेतही तो खराब फॉर्ममुळे फ्लॉप झाला. कसोटी क्रिकेटमधील सातत्याच्या खराब कामगिरीनंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले.

विजय हजारे करंडकात चमकदार खेळी :
वेस्ट इंडिज दौरयत फ्लॉप झालेल्या केएल राहुलवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती, पण आता या टीकेला त्याने फलंदाजीने प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान , विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत केएल राहुलने केरळविरुद्ध १२२ चेंडूत १३१ धावांचे तुफानी शतक ठोकले आहे. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ शानदार षटकार लगावले आहेत.

कारकिर्दीला मिळू शकते उभारी :
जर केएल राहुल याच फॉर्म मध्ये कामगिरी करत राहिला तर तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नव्याने उभारी देऊ शकेल. वर्ष २०१३ नंतर रोहित शर्माने ज्या प्रकारे क्रिकेट कारकीर्दीला वेगळी उभारी दिली अगदी त्याप्रमाणेच केएल राहुलदेखील आपल्या क्रिकेट कारकिर्दीला नवसंजीवनी देऊ शकेल. तथापि, सध्या तो केवळ भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. तो भारताच्या वनडे आणि टी -२० संघात कायम आहे.

Visit : Policenama.com