पोलिसांकडे तक्रार केली म्हणून चाकूहल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चबुतर्‍याचे बांधकाम पाडण्यासाठी पोलिसांना फोन व पत्रव्यवहार केल्याच्या कारणावरुन सहा जणांच्या जमावाने एकावर चाकूहल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. वाळकी येथील हॉटेल किनारा जवळ ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, विष्णू भिवा कासार (वय 26) हा त्याच्या मित्रासह वाळकीतील हॉटेल किनारा येथे उभा असताना गावातील विश्‍वजित रमेश कासार, इंद्रजित रमेश कासार व त्याचे मित्र सुनिल फक्कड अडसरे, कुलदिप रुपचंद कासार, महेश एकनाथ गवळी (सर्व रा.वाळकी), प्रशांत दिपक उदावंत (रा.देवळगाव सिद्धी) हे तेथे आले व त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतर्‍याचे बांधकाम पाडण्यासाठी मागील महिन्यात पोलिसांना फोन व पत्रव्यवहार का केले असे म्हणून त्याला रोडवर बोलावून काठीने, चाकुने व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली.

महेश गवळी याने चाकुने त्याच्या छातीवर मारुन जखमी केले. व इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत विष्णू कासार हा जखमी झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी विष्णू कासार याच्या फिर्यादीवरुन भादविक 143, 147, 149, 324, 324, 504, 506, 34, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) (3)/135 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे. कॉ. गायकवाड हे करीत आहेत.

Visit : Policenama.com