अहमदनगर : मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याने चाकूने सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईक मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याच्या रागातून दोघांवर चाकूने सपासप वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जामखेड शहरात ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अनिल उत्तम पवार (वय 55), सुरेश अनिल पवार (वय 26, दोघे रा. जामखेड, जि. नगर) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत मिथुन चंद्रकांत काळे व संतोष पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेआठ वाजता मिथुन काळे यांनी सुरेश पवार यास ‘तू नातेवाईक मुलीस पळवून का नेले’, अशी विचारणा केली. त्यामुळे सुरेशला राग आला. सुरेश व त्याच्या वडिलांनी मिथुन काळे व संतोष पवार यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात काळे यांच्या छातीवर व पवार यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून जामखेड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like