मित्राकडून मैत्रिणीवर चाकूने सपासप वार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बोरिवली नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेलेल्या मित्र-मैत्रिणीमध्ये काही करणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतर जोरदार भांडणात झाल्याने मित्राने मैत्रिणीवर धारदार चाकूने सपासप वार करुन स्वत:वर देखील वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी घडली आहे.

आज दुपारी पीडित मुलगी आणि तीच्या मित्रासोबत नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये काही करणावरुन वाद झाले. याच वादातून मित्राने सोबत आणलेल्या धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. मैत्रिणीवर वार करुन त्याने स्वत:वर देखील वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची माहिती कस्तुरबा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमी मित्र-मैत्रिणीवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण, तरुणाने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला का केला? याचा शोध पोलीस घेता आहेत.

Uber चालकाचा अपमान केल्यास उबर करणार ‘ही’ कारवाई
वर्षातील काही दिवस प्रौढ पुरुषांना सेक्स फ्री… महिला कार्यकर्त्याची राहुल गांधींवर चिरफाड टीका
आरपीआयचा कार्यकर्ता पिंपरीतून तडीपार