धक्कादायक ! पत्नी, मेव्हण्यासह मुलावर चाकूने सपासप वार ; ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती वादातून एकाने आपली पत्नी आणि ६ वर्षाच्या मुलाच्या गळावर वार केल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हण्यावरही वार करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना लोणी काळभोरमधील पठारे वस्ती येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चारित्र्याचा संशय घेऊन त्याने हे कृत्य केले आहे.

या घटनेत आयुष योगेश बसेरे या ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला असून अन्य तिघेही जखमी झाले आहेत.
योगेश परसराम बसेरे (वय ३५), त्याची पत्नी गौरी ऊर्फ किरण बसेरे (वय २६) आणि मेव्हणा भारत उत्तम शिरोळे या तिघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याबाबत भारत शिरोळे याने फिर्याद दिली आहे. योगेश हा आपली पत्नी गौरी हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ती आपल्या भावाकडे रहायला आली होती. दोघेही जवळजवळ राहतात. योगेश गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भरत याच्याकडे आला व मला पत्नीशी बोलायचे आहे, असे म्हणाला. त्यानंतर तो व गौरी हे जवळपास १५ ते २० मिनिटे बोलत होते. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊन योगेशने गौरीच्या गळ्यावर चाकूने वार करुन आयुषच्या गळ्यावरही वार केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून भारत धावत घराबाहेर आला.

तेव्हा योगेशने त्याच्यावरही चाकूने वार करुन त्याला जखमी केले. त्यानंतर त्याने स्वत:च्या अंगावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा आरडाओरडा ऐकून लोकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने चौघांना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच आयुष या ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. अन्य तिघांवर उपचार करण्यात येत असून लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे

You might also like