शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचारादरम्यान चाकू हल्ला

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळीमध्ये शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हा हल्ला झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. कळंब तालुक्यात प्रचारसभा सुरू होण्यापुर्वी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, झालेल्या चाकू हल्ल्यात खा. ओमराजे निंबाळकर हे बचावले असल्याचे सांगण्यात आले आहे.

अचानकपणे प्रचारसभा सुरू असताना हा चाकू हल्ला झाला आहे. खा. ओमराजे यांनी पोटावरचा वार हातावर घेतल्याने त्यांना किरकोळ जखम झाली असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. कळंब – उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ (नायगाव) पडोळी गावात रस्त्यावरून चालत जात असताना हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली असून यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्हयातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like