चेष्टामस्करीतून सांगलीत युवकावर चाकूहल्ला

सांगली :पोलीसनामा ऑनलाईन

चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना वारणालीतील गंगानगर येथे मंगळवारी (दि.७) रात्री साडेनऊच्या सुमारास  घडली. याप्रकरणी एकाविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e8c4b96-9b2b-11e8-a04b-29d94f91f55a’]

यामध्ये सूरज रमेश इरसूळ (वय 23) जखमी झाला आहे. अविनाश काळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैशाली रमेश इरसूळ यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पत्नीला आणण्यासाठी निघाला होता. त्यावेळी अविनाशने त्याला अडवून थांबवले. त्यानंतर त्याने सूरजची चेष्टा, मस्करी सुरू केली. त्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर अविनाशने खिशातील चाकू काढून सूरजवर वार केले.

यामध्ये सूरच्या पोट, पाठ, डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. घटना घडल्यानंतर अविनाश तेथून निघून गेला. नंतर सूरजला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत बुधवारी सकाळी सूरजची आई वैशाली इरसूळ यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाशनवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.