माथेफिरूचा जमावावर ‘चाकू’ हल्ला ; दोघांचा मृत्यू, १७ जण जखमी

टोकीयो : वृत्तसंस्था – जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरू तरूणाने लोकांची गर्दी असलेल्या ठीकाणी जमावावर चाकूने हल्ला केला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. जवळपास २० लोकांवर या तरूणाने हल्ला केला, तर त्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच यात १७ जण जखमी झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

जापानमधील कावासाकी शहरातील एका पार्कच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. या माथेफिरू तरूणाने अचानक चाकूने जमावावर हल्ला केला. त्यात अनेक जखमी झालेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चाकू जप्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यामागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक केली तेव्हा त्याने हातातील चाकून स्वत:वरच वार करून स्वत:ला जखमी करून घेतलं, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. तर स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक इमर्जन्सी कॉल आला. त्यामध्ये एका व्यक्तीने बस स्टॉपजवळ पोहोचताच उपस्थित लोकांवर चाकूने वार केले असल्याची माहिती देण्यात आली. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या काही व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती कावासाकी अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्यांनी एएफपीला दिली. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात भितीचे वातावरण आहे.

You might also like