ESIC | कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला ESIC ने दिला आधार; नवीन योजनेनुसार मिळणार दरमहा पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या Corona संकटाना अनेकांनी मदतीचा हात पुढे केले आहेत. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने देखील मदतीसाठी पुढे सरसावली आहे. पहिल्या लाटेत रोजगारापासून वंचित असणाऱ्यांना विमा महामंडळाने आर्थिक Finance दिलासा दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यू Death झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला Family आधार देण्याचा महामंडळाने (ESIC) निर्णय घेतला आहे. विमा महामंडळाकडून (ESIC) कोविड-१९ रिलीफ स्‍कीम सुरू केली जात असून या योजनेंतर्गत कुटुंबियांना दरमहा पगार Salary दिला जाणार आहे. ही योजना तीन जूनपासून लागू करण्यात आली असली तरी याबाबत पूर्ण तयारी झाल्यानंतर आता औपचारीक नोटिफिकेशन जारी करण्यात येत असल्याची माहिती ESIC मध्ये इन्शुरन्स कमिश्‍नर, रेव्हेन्‍यू अँड बेनिफिट एम. के. शर्मा यांनी दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

डॉ. शर्मा M. K. Sharma म्हणाले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी साधी सरळ सोपी पद्धत करण्यात आली आहे.
जेणेकरून विमा महामंडळामध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा जर कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाल सहज याचा लाभ घेता येईल.
जर कोरोनामुळे विमा महामंडळामध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलं, अवलंबून असणारे आई-वडील किंवा बहीण-भाऊ यांना दरमहा कर्मचाऱ्याच्या अंतिम वेतनाच्या ९० टक्के पेमेंट केलं जाईल.
जर एखाद्या व्यक्तीचा पगार १५ हजार रुपये महिना असेल तर त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला १५ हजाराच्य ९० टक्के रक्कम दरमहा दिली जाईल.
यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळेल.

या योजनेनुसार मृत कर्मचार्‍याच्यी पत्नी जोपर्यंत दुसरा विवाह करत नाही, तोपर्यंत आणि मुलगी असेल तर तिला विवाह करेपर्यंत त्यांना हा लाभ घेता येईल.
त्याचबरोबर आयुष्यभर पेन्शनच्या pension रूपाने पालकांना या योजनेचा लाभ मिळेल.
यासह मुलगा प्रौढ होईपर्यंत त्याला या योजनेचा लाभ मिळेल.

काय आहे योजनेची पात्रता
कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये कोणत्याही कंपनीत काम करताना वर्षभरात किमान ७० दिवसांसाठी योगदान दिले आहे,
अशा कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर या योजनेचा लाभ कुटुंबास मिळेल.
याशिवाय तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही कंपनीचा कोरोना होण्यापूर्वी कर्मचारी असणे आवश्यक असते.
या दरम्यान, जर त्याला कोरोना Corona असेल आणि त्याचा मृत्यू Death झाला तर त्याचे कुटुंब या योजनेस पात्र ठरेल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  know about esic covid 19 relief scheme esic will pay 90 per cent salary of employee to family after covid death

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा