काय आहे जिनिव्हा करार ? दुसऱ्या देशाच्या सैनिकांसोबत कशी करावी लागते वर्तवणूक ? 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेला F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -२१ या विमानाचा सामावेश होता. एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले नाही. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. या विमानात भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. अभिनंदन यांचे व्हिडीओ , फोटो पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले आहेत. भारताने जिनिव्हा करारानुसार भारतीय कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात सोडण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी देखील कारगिल युद्धानंतर भारताचा एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात होता. पण त्यानंतर जिनिव्हा करारानुसार त्याची सुटका करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर हा कायदा अधिक चर्चेत आला. मानव अधिकारांची जपणूक करणे हे या मागचे मुळ उद्दीष्ट होते. ते जपण्यासाठी काही कलमांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सर्व देशांना या संधीचं पालन करणं बंधनकारक आहे.

काय सांगतो जिनिव्हा कायदा 
–युद्धकैद्याला मानवतेची वागणूक द्यावी
–जखमी सैनिकांना आवश्यक आणि योग्य उपचार द्यावेत
–युद्धबंदी सैनिकासोबत कुठलाही प्रकारचा भेदभाव करू नये
–सैनिकांना जेवण आणि इतर आवश्यक सुविधा द्याव्यात
–युद्धबंदीला कोणत्याही प्रकारची अमानवीय वागणूक देण्यास बंदी
–युद्धबंद्याला धमकी देणे, मारहाण करणे, शारीरिक छळ करण्यास मनाई
–युद्धबंदीची जात, धर्म, जन्मासंदर्भात चौकशी करू नये
–युद्धबंदीला केवळ त्याचं नाव, हुद्दा, बॅच नंबर, युनिट एवढीच माहिती विचारण्याचा अधिकार
–जखमी सैनिकाचे फोटो, व्हिडीओ प्रसारित करण्यास मनाई
–युद्धबंदीवर खटला चालवू शकतात, मात्र युद्ध संपल्यावर त्याला त्याच्या देशाच्या ताब्यात द्यावं
आंतरराष्ट्रीय जिनिव्हा करारानुसार युद्ध कैद्यांसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. यानुसार युद्ध कैद्यांना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही. त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही.  युद्ध कैद्यांना घेऊन जनतेत उत्सुकता देखील तयार केली जाऊ शकत नाही.
jinivha-act-1
                                        जिनिव्हा परिषद १९५४