‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डमुळं छोट्या दुकानदारांना ‘फायदाच फायदा’ ; बँक आणि केंद्र सरकारचा उपक्रम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – HDFC बँक आणि भारत सरकारने CSC ने मिळून एक विशेष क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे आता छोटे दुकानदार आणि गावा खेड्यातील व्यवसायिकांना दररोजच्या व्यवसायिक खर्चांसाठी रोख रक्कमेच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. भारत सरकार आणि HDFC ने मिळून एक स्मॉल बिजनेस मनी बँक क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. देशातील हे एक असे क्रेडिट कार्ड आहे जे विशेषता ग्रामीण भागात राहणाऱ्या छोट्या व्यवसायिकांसाठी बनवण्यात आले आहे. २०१८ साली HDFC बँक आणि CSC ने एक करार केला आहे. ज्याअंतर्गत ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे बँकिंग सेवा देण्यात येईल. ग्रामीण भागातील लाखो लोकांना बँकिंग सेवा देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे, ज्यांच्या पर्यंत बँकिंग सेवा पोहचू शकत नाही.

यामुळे छोटे दुकानदार आणि गावातील व्यवसायिकांना रोजच्या व्यवसायिक खर्चासाठी सहज पैसे उपलब्ध करु शकतात. हे कार्ड HDFC बँकेेचे एमडी आदित्य पुरी आणि सीएससी चीफ दिनेश कुमार त्यागीने लॉन्च केले आहे.

यात काही महिलांना उद्योग करणाऱ्यांना हे कार्ड देण्यात आले आहे, सीेएससी विविध सेवांच्या डिलिवरीसाठी एक्सेस प्वाइंटच्या रुपात कार्य करत आहे. देश भरात यांचे ३.६ लाख केंद्र आहेत.

काय करते सीएससी
इलेक्ट्रॉनिक्स आणि इनफॉरमेशन टेक्नोलॉजी मंत्रालयाने सरकारच्या डिजीटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सीएससी बनवले आहे, याला लोकल स्किल्ड एंटरप्रेन्योर्स द्वारे चालवण्यात येते, ज्याला VLE देखील म्हणले जाते.

याचा फायदा भारतातील लहान व्यापारी, दुकानदार, गावातील व्यवसायिक यांना होणार आहे. ऐनवेळी रोख रक्कमेच्या समस्या या व्यवसायिकांना येत असल्याने सरकार आणि HDFC ने हे पाऊल उचलेले आहे.त्यामुळे यांचा फायदा छोटे दुकानदार आणि ग्रामीण भागातील व्यवसायिक यांना याचा फायदा होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने