LPG गॅस सिलिंडर मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी, कागदपत्राची गरज नाही, फक्त एक कॉल, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नियमितपणे इंधनदरवाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह घरगुती गॅसच्या किंमतीही वाढत आहेत. सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे नियोजन आणि आर्थिक बजेट बिघडल्याचे पहायला मिळत आहे. गॅस हा प्रत्येकाची नित्याची गरज बनलेला आहे. गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक ग्राहकाला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र दिल्यानंतर आपल्याला सिलिंडर मिळतो. मात्र आता LPG गॅस सिलिंडर मिळवण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.

LPG गॅस सिलिंडर सहज घरी घेऊन जा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेनुसार ग्राहकाला केवळ एका कॉलवर 5 किलो LPG सिलिंडर सहज घरी मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्र देण्याची किंवा दाखवावी लागणार नाहीत. आपण आपल्या शहरातील कोणत्याही इंडियन गॅस वितरकाकडून सहजपणे 5 किलो LPG सिलिंडर खरेदी करु शकता. गॅस एजन्सीवर जाऊनही 5 किलोचा LPG सिलिंडर लगेच घेऊ येऊ शकता.

इंडियन ऑईल कंपनीकडून टोल फ्री क्रमांक जारी

इंडियन ऑईल कंपनीने 1800-22-4344 हा टोल फ्री क्रमांक 5 किलोच्या LPG गॅस सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क करुन तुम्ही 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर घरी मागवू शकता. मात्र, यासाठी नाममात्र वितरण शुल्क 25 रुपये द्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा देणे आवश्यक आहे, असे सांगण्यात येत आहे.

अवघ्या दोन तासात सिलिंडर घरपोच

LPG गॅस सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये तुमच्या घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचा अ‍ॅड्रेस प्रूफ देण्याची आवश्यकता लागणार नाही. दिल्लीत या सिलिंडरची किंमत अनुदानाशिवाय 340 रुपये आहे. तसेच LPG सिलिंडर तुम्ही कोणत्याही इंडियन गॅसच्या विक्री केंद्रावरुन पुन्हा रिफिल करु शकता. LPG गॅस सिलिंडर रिटर्न करण्याची मुदत तुम्ही खरेदी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षे असेल. सिलिंडर रिटर्न केल्यानंतर गॅस आणि कराचा खर्च वगळता सिलिंडरची खरेदी किंमत आणि प्रेशर रेग्युलेटरचे 50 टक्के पैसे परत दिले जातील.