तुमच्या नावाचं सिम कार्ड दुसरं कोणी वापरतंय? तर लगेच माहिती उपलब्ध होणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कित्येक लोक मोबाइल वापरतात. अनेक क्षेत्रात असणारे लोक एक नाहीतर दोन दोन मोबाइलचा वापर करतात. तसेच ड्युअल सीम कार्ड असणाऱ्या मोबाईलची संख्या देखील अधिक आहे. परंतु, यावरून बनावट आयडीचा वापर करून सिम नंबरवरून अनेक गुन्हे घडले आहे. तसेच एकाच्या नावावर असणारे सिम दुसरा कोणीतरी वापरत असतं असा प्रकार समोर आला आहे.

एखाद्या व्यक्तीच्या नावावर कोणी मोबाइल क्रमांक वापरत असेल, तर याची माहिती युजर्सला मिळत नाही. परंतु, आता ही माहिती सुद्धा समजू शकणार आहे. तसेच व्यक्तीच्या नावावर किती सीमकार्ड सुरू आहेत, याची माहिती सुद्धा आता मिळणार आहे. तर हे करण्यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in असे संकेतस्थळ तयार केले आहे. याच्या साहाय्याने व्यक्ती सहज जाणून घेऊ शकणार आहे की, त्याच्या नावावर आता किती मोबाइल क्रमांक वापरले जाते. तर दुसऱ्या व्यक्तीच्या तपशीलचा वापर करून मोबाइल सीमकार्ड घेणे हे बेकायदेशीर आहे. मात्र, अशा घटना सतत पुढं येत असल्याने. दूरसंचार विभागाने या टूलला लाँच केले आहे, अशी माहिती समोर आलीय.

या तयार केलेल्या ऑनलाइन टूलच्या मदतीने जो क्रमांक व्यक्ती वापरत नसते अशा नंबर्सपासून ती व्यक्ती बचाव करू शकते. या वेबसाइटनुसार युझर्सना माहिती मिळू शकेल की, त्यांच्या नावावर कोण-कोण सीमकार्ड वापरत आहेत. किती मोबाइल क्रमांक सुरू आहेत. तसेच त्याच्या नावावर कोणी सीमकार्ड वापरत असल्याचे आढळून आल्यास युझर्स या नंबर्सला ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाकू शकतात, अशी माहिती दूरसंचार विभागाचे उप संचालक जनरल ए रॉबर्ट रवी यांनी दिली आहे. तसेच, एका व्यक्तीला अधिकाधिक ९ मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकते. अनेक युजर्संच्या नावावर ९ हून अधिक मोबाइल कनेक्शन सुरू आहेत. हे पोर्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात आहे.

दरम्यान, याव्यतिरिक्त या सर्विसला इतर फेज मध्ये लागू केले जाणार आहे. युजर्स या पोर्टलद्वारे सहज आपल्या नावावर सुरू असलेले कनेक्शनसंबंधी माहिती करू शकतात. यासाठी त्यांना आपला सुरू असलेला क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर १ OTP मिळेल. याच्या साहाय्याने ते सर्व चालू क्रमांकासबधी माहिती मिळवू शकतात. तसेच, डिपार्टमेंटच्या सर्व कंज्यूमर्सला SMS च्या माध्यमातून याची माहिती देण्यात येते की, त्यांच्या नावावर किती क्रमांक चालू आहेत. त्यानंतर ग्राहक पोर्टलवर जाऊन त्या क्रमांक बाबत अहवाल करू शकणार आहे.