रोज Laptop वर काम करता का ? सतत होते डोकेदुखी आणि डोळ्यांना त्रास ? असू शकतो ‘हा’ गंभीर आजार ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्ही सतत कंप्युटर किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर तुम्हाला अनेकदा डोळ्यांन त्रास जाणवतो. डोळ्यात जळजळ होणं किंवा धुसर दिसणं अशा समस्या येतात. असं काही होत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण ही गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.

कॅप्युटरमधून येणारी लाईट आणि त्यावर आपण वाचणारे शब्द यामुळं डोळ्यांवर ताण येतो आणि त्रास होतो. कधी कधी खांदेही दुखतात. डोळ्यांवर येणारा उजेड दबाव निर्माण करतो. यामुळं तुम्हाला व्हिजन सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. सक्रीनकडे सतत एकटक पाहिल्यानं हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

व्हिजन सिंड्रोम होतो तेव्हा काय होतं ?

–  डोळे लाल होतात.

–  डोळ्यांनी धुसर दिसणं

–  डोळ्यांच्या आतल्या बाजूला खाज येते.

– डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा समस्या येतात

‘अशी’ घ्या काळजी

–  कंप्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनपासून किमान 20 ते 26 इंच अंतर ठेवा

–  स्क्रीनचा ब्राईटनेस गरेजनुसार अॅडजस्ट करा.

–  पापण्यांची हालचाल करा आणि त्यावर लक्ष असू द्या. कारण स्क्रीनकडे एकटक पाहताना याकडे खूप दुर्लक्ष होतं.

–  काम करताना मध्ये मध्ये किमान 5 मिनिटे वेळ काढून शरीराचीही हालचाल करा.