LIC ची सर्व सामान्यांसाठी खास योजना ! केवळ 100 रुपये भरा अन् मिळवा 75 हजारांचा लाभ, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईनः सध्याच्या काळात सुरक्षित भविष्यासाठी जीवन विमा हा खूप महत्त्वाचा आहे. आयुर्विमा क्षेत्रातील भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. गरीब लोकांचे हित लक्षात घेऊन जीवन विमा महामंडळाने आम आदमी विमा योजना सुरू केली. यानुसार विमाधारकास बरेच फायदे मिळतात.

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आम आदमी बीमा योजना नावाची योजना आणली आहे. जीवन विमा संरक्षणातील फायद्यांव्यतिरिक्त, राज्यातील ग्रामीण भूमिहीन कुटुंबाच्या प्रमुखांना आंशिक आणि कायमस्वरूपी अपंगत्व किंवा कुटुंबातील एखाद्या कमावत्या सदस्याला या योजनेंतर्गत लाभ मिळतो. या विमा योजनेचा लाभ 18 ते 59 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. मात्र, यासाठी अर्जदार कुटुंबाचा प्रमुख अशी अट नाही. LIC च्या आम आदमी विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी रेशनकार्ड, जन्म दाखला, शाळेच्या दाखलाचा पुरावा, मतदार ओळखपत्र, सरकारी खात्याने दिलेली ओळखपत्र, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेनुसार, विमा संरक्षण कालावधीत सदस्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्तीला 30 हजार मिळतील. नोंदणीकृत व्यक्तीचा अपघातामुळे किंवा अपंगत्वामुळे मृत्यू झाल्यास पॉलिसीनुसार नामनिर्देशित व्यक्तीला 75 हजार दिले जातील. LIC च्या या आम आदमी विमा योजनेसाठी 30 हजार रुपयांच्या विम्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे प्रीमियम प्रति वर्ष 200 रुपये घेतले जाते. LIC कडून चालवली जाणारी ही योजना सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारी आहे.