‘ही’ आहे LIC ची ‘उत्‍तम’ पेन्शन स्कीम, टॅक्समध्ये सवलतीसह ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा महामंडळ पेन्शनसाठी ‘जीवन शांति स्कीम’ सुरु केली आहे. या योजनेनुसार आपण तात्काळ पेन्शन पर्याय निवडू शकता किंवा वार्षिक पर्याय निवडू शकता. मागील वर्षी नुकतीच सुरू करण्यात आलेली ही पेन्शन योजना आयुष्यभरापर्यंत तुम्हाला निश्चित पेन्शन देते. पॉलिसीधारकही या निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करु शकतात. जर तुम्ही ही पेन्शन योजना ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला त्यावरील 2 टक्के वार्षिक रक्कमही मिळेल. या योजनेंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सीसीसी अंतर्गत करात सूट मिळेल.

या योजनेंतर्गत 7 पर्याय आहेत. यानुसार तुम्हाला पुढच्या महिन्यापासून ठराविक रक्कम मिळू शकते.

एका निश्चित दराने जीवनभर पेन्शन
1)
5, 10, 15, किंवा 20 वर्षे पेन्शन आणि त्यानंतर आपण जिवंत असेपर्यंत या पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
2) आजीवन पेन्शनबरोबरच पेन्शनरच्या मृत्यूच्या वेळी मूळ किंमतीवर परतावा देण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल.
3) आजीवन पेन्शन दरवर्षी 3% ने वाढविण्याचा पर्याय
4) पेंशन फॉर लाइफमध्ये पेंशनदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला 50% निवृत्तीवेतनाचा पर्याय आहे.
5) पेन्शन फॉर लाइफ, ज्यामध्ये पेंशनदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला 100% पेन्शन देण्याचा पर्याय आहे.
6) निवृत्तीवेतनाच्या आयुष्यात पेंशनदाराच्या जीवनकाळात जोडीदारास देय असलेल्या पेंशनच्या 100% तरतूदीसह आयुष्यभर निवृत्तीवेतन देण्याचा पर्याय आहे.
7) तुमच्याकडे डिफर्ड एन्युटीमध्ये दोन पर्याय देखील आहेत.
यामध्ये पहिल्या पर्यायांतर्गत पेंशनधारकाच्या जीवनकाळात निवृत्तीवेतनाचा पर्याय आहे, तसेच तुम्ही ज्वाइंट लाइफ पर्यायाची निवडदेखील करू शकता.

Visit – policenama.com 

You might also like