Lockdown चा साईड इफेक्ट : ‘या’ आजारानं ग्रस्त होतायेत सर्व वयातील लोक, दिसतात ‘ही’ 7 लक्षणे, जाणून घ्या उपाय

नवी दिल्ली : कार्तिकचे वय 18 वर्ष आहे आणि तो 12 वीत शिकत आहे. रोज त्यास 7 ते 8 तास ऑनलाईन क्लासेस अ‍ॅटेंड करावे लागतात. ज्यामुळे त्याची अ‍ॅक्टिव्हिटी घराच्या आतच होत आहे. यामुळे कार्तिकला आळस जाणवतो. तो यापूर्वी 6-7 तास झोपत असे, आता रात्र दिवस मिळून 15 ते 16 तास त्यास झोपतोय. तो खेळण्यासाठी जाऊ शकत नाही. आपल्या मित्रांना भेटू शकत नाही. त्याच्या डोळ्यांत, डोक्यात आणि शरीरात वेदना होत राहातात. असे केवळ कार्तिकच्या बाबतीतच घडत नसून अन्य अनेक लोकांच्या बाबतीत घडत आहे. या समस्येचे नाव आहे लॉकडाऊन फॅटीज. प्रत्येक वयाच्या लोकांवर याचा परिणाम होत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, शरिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे निरोगी राहून कोरोना व्हायरसच्या सोबतच ही समस्या दूर होऊ शकते.

लॉकडाऊनमुळे लोक जास्त अ‍ॅक्टिव्ह नाहीत. घरात सुरक्षित तर आहेत, परंतु ताजेतवाने नाहीत. लोकांना थकवा जाणवत आहे. याचा परिणाम मानसिक आणि शरीरीक स्तरावर होत आहे. लॉकडाऊन दरम्यान स्वत:ला अ‍ॅक्टिव्ह आणि फिट कसे ठेवायचे, याबाबत जाणून घेवूयात.

लॉकडाऊन फॅटीजची लक्षणे

1- शरीर उत्साही नसने
2- कमी झोप
3- कॉन्सन्ट्रेशनची कमतरता
4- एन्झायटी
5-इनडायजेशन
6- शरीरात वेदना
7- थकवा

हे आहेत उपाय

1- घरातच अ‍ॅक्टिव्ह राहा

2- भरपूर पाणी प्या

3- ऑयली फुडपासून दूर राहा

4- नियमित व्यायाम करा

5- एन्झायटी दूर करण्यासाठी योग आणि प्राणायाम करा

6- काही वेळ उन्हात थांबा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन्सची गोळी खा

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये लोकांना विविध प्रकारच्या समस्या होत आहेत. तसेच विविध वयाच्या लोकांच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरात असल्याने शरीराची व्यवस्थित हालचाल होत नाही. यामुळे लोकांना विविध प्रकारच्या समस्या होत आहेत. मुलांवर ऑनलाईन स्टडीचा ताण येत आहे. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये डोकेदुखी आणि डोळे दुखणे अशा समस्या होत आहेत. मध्यम वयाच्या लोकांमध्ये काम, भविष्य आदीच्या विचारांमुळे तणाव दिसत आहे. वर्क फ्रॉम होममुळे कामाचा ताण वाढला आहे. घरीच अनेक तास फोनवर बोलावे लागत आहे. एकुणच जीवनशैली बदलली आहे. महिलांवर कामाचा जास्त ताण आला आहे. ही लॉकडाऊन फॅटीजची प्रमुख कारणे आहेत.