हजारो वर्षांनंतर अद्भुत योग ! महामानवाच्या जन्माचे संकेत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नवग्रहांपैकी तब्बल सहा ग्रह आपापल्या स्वगृही अर्थात आपले स्वामित्व असलेल्या राशीत विराजमान झाले असून सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर अत्यंत अदभूत आणि दुर्लभ असा योग जुळून आला आहे. रविवार, १३ सप्टेंबर २०२० ते मंगळावर, १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत नवग्रहांपैकी तब्बल सहा ग्रह आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान झाले आहेत. खगोलीय गणना आणि पंचांगानुसार, अत्यंत अद्भुत आणि दुर्मीळ असा शुभ योग्य परत तब्बल ४०० वर्षांनी जुळून येऊन शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

तीन दिवस अत्यंत शुभलाभदायक

या तीन दिवसात जन्मलेली बालके अत्यंत प्रभावशाली, बुद्धिमान, शक्तीसंपन्न, उत्तम नेतृत्वगुण असलेली घडू शकतील. तसेच नवग्रहातील प्रमुख ४ ग्रह असल्याचा शुभ प्रभाव दर्शवतो, असे म्हटले जात आहे. ज्यावेळी ५ ग्रह स्वगृही असतात, तेव्हा महाशक्ती संपन्न योग जुळून येतो. या योगावर जन्म घेतलेली बालके भविष्यात एखाद्या महापुरुषाप्रमाणे दैदिप्यमान कारकीर्द घडवू शकतात. जेव्हा सहा आणि सात ग्रह स्वगृही म्हणजेच आपले स्वामीत्व असलेल्या राशीत विराजमान असतात, तेव्हा अवतार शक्ती प्रकटीकरणाचे योग जुळून येत असतात, असे सांगितले जाते. ग्रहांची वैयक्तिक स्थितीही अशा प्रकारच्या शुभ योगांमध्ये भर घालत असते. या अद्भुत आणि दुर्लभ योगाच्या कालखंडात तब्बल १२ प्रकारच्या कुंडली निर्माण होतात. हा ५१ तास आणि ८८ मिनिटांचा दुर्मीळ आणि अद्भुत योग असताना एखाद्या महान सर्वशक्तिसंपन्न व्यक्ती किंवा महापुरुषाचा जन्म झाला असणार, असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

शुभ आणि दुर्लभ योगाचा काळ

रविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०१ वाजून २० मिनिटांनी आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०१ वाजून १६ मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर धनु लग्न आणि केंद्र व त्रिकोणात नवग्रहांपैकी ६ ग्रह विराजमान होते. लग्न स्थान धनु असल्याने केंद्राचे स्वामीत्व गुरुकडे होते. पंचम स्थामी मंगळ, सप्तम स्थानी राहु, नवव्या स्थानी सूर्य आणि दहाव्या स्थानी बुध आरुढ असल्याने ही स्थिती अद्भूत योगाची कारक मानली गेली. त्याशिवाय धन स्थानी शनी आणि अष्टम स्थानी शुक्र आणि चंद्र विराजमान झाल्याने हा विलक्षण योग निर्माण झाला आहे, असे म्हटले जाते.

महान विभूतींना जन्मयोग

शुक्र अष्टम स्थानी विराजमान झाल्यावर विश्वकल्याणासाठी स्वतःचा आनंद, दुःख विसरायला लावणाऱ्या परिस्थिती उद्धवतात. अशी स्थिती एखाद्या महान पुरुषाच्या अवतार प्राकट्यावेळी निर्माण होत असे, असा दावा करण्यात येतो. रविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०३ वाजून २४ मिनिटांनी आणि सोमवार १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०३ वाजून २० मिनिटांनी एखाद्या महान अध्यात्मिक विभूतीने जन्म घ्यावा, असा हा शुभ आणि दुर्लभ योग असल्याचे सांगितले जात. या मुहूर्तावर लग्नेश शनी, सुख स्थानी मंगल, सप्तम स्थानी चंद्र व शुक्र आणि भाग्य स्थानी बुद्ध आरुढ होते. त्याशिवाय स्वगृही असलेला गुरु व्यय स्थानी आणि षष्ठम स्थानी राहू विराजमान होऊन एक उत्तम योग जुळून असल्याचे म्हटले जाते.

पुढील शताब्दीपर्यंत लक्षात राहील असा योग

कुंडलीतील केंद्र आणि त्रिकोणात सहा ग्रह विराजमान झाले असल्याने एखाद्या महान व्यक्तीच्या जन्माचा रविवार, १३ सप्टेंबर सायंकाळी ०६ वाजून ३३ मिनिटांनी आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६ वाजून २९ मिनिटांनी योग जुळून आल्याचं सांगितलं जात. तसेच १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजून ५८ मिनिटांनी आणि १४ सप्टेंबर ०७ वाजून ५४ मिनिटांनी शनी महादशेत एक यशस्वी राजा,अद्भुत राजकीय नेता यांच्या जन्मानुसार योग्य जुळून आलेले. सदर योगांवर जन्माला आलेली बालके भविष्यात अद्भुत, अद्वितीय, अचाट कामगिरी करु शकतील, असे भाकीत वर्तवण्यात आले. तर, १४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०६ वाजून २१ मिनिटे आणि आणि १५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०६ वाजून १७ मिनिटे या शुभ मुहुर्तावर कन्या लग्न होते. अशी ग्रहस्थिती दिग्गज वैज्ञानिक, गणितज्ज्ञ किंवा प्रचंड बुद्धिमान व्यक्तींच्या जन्माचे योग जुळून येणारी होती, असे भाकित आणि दावा करण्यात येत आहे.