हातावर ‘इथं’ तयार होते लग्नरेषा, जाणून घ्या वैवाहिक जीवनाची संपुर्ण ‘कुंडली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हस्त रेषा ज्योतिषच्या सहाय्याने हातावरील रेषा समजून घेऊन आयुष्यात होणाऱ्या अनेक गोष्टींबाबत माहिती मिळवता येऊ शकते. हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात ज्यामध्ये जीवन रेषा, भाग्य रेषा, ह्रदय रेषा आणि विवाह रेषा प्रमुख असतात. जीवन आणि भाग्य रेषा या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आणि भाग्याबद्दल माहिती देतात. विवाह रेषेमुळे व्यक्तीचे प्रेम प्रसंग आणि विवाहित जीवनाबाबत माहिती मिळते.

विवाह रेषेनुसार व्यक्तीच्या जीवनात विवाहाचा योग्य कधी आहे, प्रेम विवाह आहे की अरेंज मॅरेज आहे ?तसेच किती विवाहाचा योग्य आयुष्यात आहे ? याबाबतची महत्वाची माहिती या रेषेद्वारे मिळते.

कोठे असते विवाह रेषा
हाताच्या सगळ्यात छोट्या बोटाखाली जिथे बुध असतो त्या ठिकाणी विवाह रेषा असते. याठिकाणी विवाह रेषा एक किंवा अधिक देखील असू शकतात.

विवाह रेषेसंबंधित काही महत्वाच्या गोष्टी
१) हातावर बुध असतो त्या ठिकाणी विवाह रेषा असते ही रेषा हृदय रेषे सोबत चालते आणि ही रेषा खूप महत्वपूर्ण मानली जाते.

२) हातावर एका पेक्षा अधिक विवाह रेषा असतील तर व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम प्रसंग वाढू शकतात.

३) विवाह रेषेमध्ये दोन फाटे फुटलेले असतील तर त्या व्यक्तीचा विवाह तुटण्याची शक्यता असते. जर एखाद्या स्त्रीच्या हातावरील विवाह रेषेजवळ एखादे द्वीप बनलेले असेल तर विवाहात एखादे संकट येण्याची शक्यता वर्तवली जाते.

४) जर एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा झुकलेली आहे तर हे शुभ लक्षण समजले जात नाही. विवाह रेषा जर लांब आणि सूर्यापर्यंत जाणारी असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य समृद्ध आणि योग्य जोडीदारासोबतचे असेल.

५) जर विवाह रेषा बुध पर्वतावर येऊन संपत असेल तर व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात खूप अडचणी येऊ शकतात. तसेच विवाह रेषा मधेच तुटलेली असेल तर विवाह देखील तुटू शकतो.

६) विवाह रेषा वरती वळलेली असेल आणि छोट्या बोटापर्यंत जाणार असेल तर त्या व्यक्तीच्या विवाहात खूप अडचणी येऊ शकतात असा व्यक्ती अविवाहित देखील राहू शकतो.

७) विवाह रेषेवर त्रिशूळचे निशाण असेल तर त्या पती पत्नीमध्ये खूप प्रेम भाव वाढतो.

८) विवाह रेषेवर आडवे निशाण अशुभ मानले जाते यानुसार त्यांचा जीवनसाथी अधिक काळ त्यांच्याकडे राहत नाही. जर विवाह रेषेवर तीळ असेल तर त्यालाही शुभ मानले जात नाही.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/