NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या सदस्यांसाठी 3 नवीन ऑनलाइन सुविधा सुरू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (PFRDA) कोरोनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या सदस्यांसाठी तीन नवीन ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत. अलीकडेच PFRDA ने डी-रेमिट (D-Remit) ही सुविधा सुरू केली. त्या माध्यमातून राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सदस्य त्यांच्या एनपीएस खात्यातून (NPS Account) आपल्या बँक खात्यात (Bank Account) पैसे पाठवू शकतात. त्याचप्रमाणे त्याच दिवसाच्या नेट ॲसेट व्हॅल्यूच्या (NAV) आधारावर पैसे दिले जातील.

डी-रेमीट या सुविधेच्या माध्यमातून ग्राहक म्युच्युअल फंडसाठी (Mutual Funds) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या पॉलिसीमध्ये नियमित अंतरावरील NPS मध्ये गुंतवणूक (Regular Investment) करू शकतील. तसेच NPS ग्राहकांसाठी PFRDA नुकतीच ई-सिग्नेचर आधारित ऑनलाइन सुविधा सुरू केली असून, त्याअंतर्गत ते त्यांच्या नॉमिनीचे नाव केव्हाही बदलू शकतात. तत्पूर्वी, PFRDA व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया सुरू केल्याने सदस्यांना ऑनलाइन पैसे काढण्याची सुविधा मिळते.

NPS साठी डी-रेमिट सुविधा कशी वापरावी

शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी डी-रेमिट अंतर्गत सदस्यांकडून सकाळी ९.३० वाजेपर्यंत ट्रस्टी बँकेला मिळालेली स्वेच्छा सहयोग रक्कम त्याच दिवशी NVA करत स्वीकारण्यात येईल. डी-रेमिट सुविधेअंतर्गत, किमान ५०० रुपये स्वीकारले जातील.

>> ही सुविधा वापरण्यास NPS ग्राहकाकडे व्हर्च्युअल आयडी असणे गरजेचे आहे. सदस्याने सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीच्या पोर्टलवर जावे.

>> नंतर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) वर नोंदणीकृत ग्राहकाच्या दूरध्वनी क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल.

>> व्हर्च्युअल आयडी एकदाच जनरेट करा. त्यानंतर, डी-रेमिटसाठी आयडी कायमस्वरूपी PRAN शी जोडला जाईल.

>> टीयर- १ आणि टिअर-२ या NPS खात्यांसाठी विशिष्ट व्हर्च्युअल आयडी आहे.

>> ज्या NPS ग्राहकांकडे नेट बॅंकिंग सुविधा आहे ते आर-रेमिट फीचरचा वापर करू शकतील.

>> नेट बँकिंगमध्ये लॉग इन झाल्यानंतर ग्राहक त्याचा व्हर्च्युअल आयडी ट्रस्टी बँकेच्या IFSC माहितीसोबत लाभार्थी म्हणून जोडला पाहिजे. नंतर सदस्याच्या बँक खात्यातून त्याचे वर्गीकरण आपोआप डेबिट करण्यात येईल. तसेच ग्राहक फंडसुद्धा ट्रान्सफर करू शकता.

NPS नामनिर्देशनमध्ये अशा पद्धतीने करता येईल ऑनलाइन बदल 

>> NPS सदस्य असल्यास तुमच्या CRA सिस्टिममध्ये लॉग इन करा. मग डेमोग्राफिक चेंजेस मेनूमधील अपडेट पर्सनल डिटेल्सवर क्लिक करा. त्यानंतर,ॲड/अपडेट नॉमिनी डिटेल पर्याय निवडा. मागितलेली माहिती जसे की नॉमिनी असलेल्या व्यक्तीचे नाव, आपला त्याचा संबंध आणि त्याचा सहभाग किती टक्के भरा.

>> सर्व माहिती अपडेट केल्यावर नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर ग्राहकांकडून मिळलेल्या ओटीपीमार्फत डिटेल कन्फर्म करा. नंतर नॉमिनेशनमध्ये केलेले बदल ई-सिग्नेचरद्वारे कन्फर्म करा. मग NPS रेकॉर्डमधील नॉमिनी डिटेल्स अपडेट केले जातील.