अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबाबत इतकी क्रेझ का असते ? मिळतात इतक्या सुविधा की ऐकून आश्चर्य वाटेल

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडन जवळपास जिंकले आहेत. बायडन जॉर्जियात डोनाल्ड ट्रंप यांच्या खुप पुढे गेले आहेत. 1992 नंतर ही पहिली वेळ आहे, जेव्हा रिपब्लिकन पार्टीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक उमेदवाराला अशाप्रकारचे समर्थन मिळाले आहे. बायडन यांना आता जॉर्जिया, पेनिसिल्व्हेनिया, नेवादा किंवा नॉर्थ केरोलिनापैकी अजून एक राज्य जिंकण्याची गरज आहे आणि ते जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी जरूर बहुमत मिळवतील.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष एक असे पद असते, जे जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षापेक्षा शक्तीशाली असते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे अमर्याद पावर्स असतात. इतकेच नव्हे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना तगडे वेतन मिळते. यासोबतच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अनेक भत्तेसुद्धा मिळतात. त्यांना ज्याप्रकारे सुविधा मिळतात, तशा जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला क्वचितच मिळत असतील.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वार्षिक 400,000 डॉलर वेतन मिळते. म्हणजेच, भारतीय चलनानुसार अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांना 2.9 कोटी रूपये वेतन मिळते. हे तर केवळ वेतन आहे. याशिवाय अनेक प्रकारचे लक्झरी भत्ते तसेच सुविधा मिळतात. त्यांना रिटायर्मेंटनंतर पेन्शनही मिळते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जी सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्या कार्यकाळात मिळते, ती आहे व्हाईट हाऊस. पहिल्यांदा 1792 ला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना व्हाईट हाऊस दिले गेले. व्हाईट हाऊसमध्ये 6 मजले आणि 132 खोल्या आहेत. टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूल आहे. 51 सीटचे थिएटर आहे. पर्सनल प्लेन, हेलीकॉप्टर अशा सुविधा सुद्धा राष्ट्राध्यक्षांना मिळतात. राष्ट्राध्यक्षांना वार्षिक 50,000 डॉलर म्हणजे 40 लाख रुपये भत्ता वेगळा मिळतो. ते एक लाख डॉलर म्हणजे 80 लाख रुपयांचा प्रवास मोफत करू शकतात. 19000 डॉलर म्हणजे सुमारे 14 लाख रुपये एंटरटेनमेंट भत्ता मिळतो.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाला 100,000 डॉलरचा अलाऊंस व्हाईट हाऊसला डेकोरेट करण्यासाठी मिळतो. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या कुटुंबियांसह 100 अन्य लोक स्थायी स्वरूपात राहतात. हे सर्व राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या कुटुंबियांचे नोकर, स्वयंपाकी, माळी तसेच मुख्य हाऊसकीपर इत्यादी असतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना बोईंग 747 विमान मिळते, त्याची रचना अतिशय वेगळी आहे. या विमानात 4000 स्क्वेअर फुटांची जागा असते. विमानात मेडिकल आपरेटिंग रूम, प्रायव्हेट खोली असते. या विमानातून एकावेळी 100 लोकांना बसण्यासाठी जागा आहे. याच्या एका तासाच्या उड्डाणासाठी 200,000 डॉलरचा खर्च येतो.