SBI च्या ‘या’ स्कीममध्ये एक वेळा गुंतवा पैसे, पुन्हा-पुन्हा मिळवा ‘रिटर्न’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांसाठी एसबीआय हे खूप विश्वासाचे नाव आहे. ही बँक अनेक आशा योजना राबवते ज्यामुळे ग्राहकांना फायदे होतात आणि ग्राहकांना चांगले रिटर्न सोबत सुरक्षेची सुद्धा खात्री देतात.

एसबीआयची एन्युटी योजना
ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून रेग्युलर इनकम कमवू शकता. इन्युटी स्कीम मध्ये ग्राहक जो पैसे जमा करतात त्यांना त्या रकमेवर एका निश्चित वेळेनंतर व्याज धरून रेग्युलर पैसे मिळण्याला सुरुवात होते

काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य
या योजनेचे खास वैशिष्ट्य हे आहे की, कमीतकमी 1000 रुपये एन्युटी (वार्षिक ) सुरुवात करता येऊ शकते आणि यात जास्तीत जास्त गुंतवणुकीवर बंधन नाही. एका वेळेसाठी तुम्ही या योजनेमध्ये कितीही पैसे गुंतवू शकता आणि त्याच हिशोबाने तुम्हाला व्याजासह निश्चित कालावधीसाठी ठरलेली रक्कम मिळते.

किती असेल गुंतवणुकीचा कार्यकाळ
या योजनेत आपण गुंतवणूकीचा कालावधी 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे किंवा 10 वर्षे निवडू शकता. यासाठीचे व्याज दर निवडलेल्या मुदतीच्या ठेवीसाठी निश्चित केलेल्या व्याजदराप्रमाणेच असतील. आपण पाच वर्षांच्या कालावधीसाठी एन्यूटी योजना निवडली असेल तर आपल्याला 5 वर्षांच्या एफडीवर जितके व्याज मिळते तितके व्याज मिळेल.

कोण सुरु करू शकते योजना
यामध्ये वयक्तिक किंवा ज्वाइट खाते असलेली व्यक्ती, बालिका नाबालिक व्यक्ती सुद्धा ही योजना सुरु करू शकतात.

एन्युटी योजनेचा फायदा
यामध्ये एफडीप्रमाणे एकदाच रक्कम जमा करावी लागते परंतु फक्त एकदाच तुम्हाला व्याजासह रक्कम मिळत नाही तर नियमित कालावधीमध्ये व्याजासोबत रक्कम मिळत राहते.

Visit : Policenama.com