तुम्ही सेकंड हँड स्ट्रेसची शिकार तर नाहीत ना ? जाणून घ्या लक्षणं

पोलिसनामा ऑनलाईन – तुम्ही सेकंड हँड हा शब्द ऐकलाच असेल. परंतु सेकंड हँड स्मोक किंवा सेकंड हँड स्ट्रेस हे शब्द कधीच ऐकले नसतील. सेकंड हँड स्मोक म्हणजे स्मोकिंग करणारी व्यक्ती दुसरीच असते. परंतु अप्रत्यक्षपणे तुम्हीही त्याला बळी पडल्यानं तुम्हालाही त्याचा त्रास सोसावा लागतो. यालाच सेकंड हँड स्मोक म्हणतात. असंच काहीच स्ट्रेसचंही असतं. सेकंड हँड स्ट्रेस नावाचाही एक प्रकार आहे. स्ट्रेस कोणताही असला तरी तो धोकादायकच असतो.

सेकंड हँड असा एक प्रकार आहे ज्यात व्यक्ती तणावात नसतो. परंतु इतरांमुळं त्याला तणावाचा सामना करावा लागतो. अनेकदा एखादी व्यक्ती तणावात असते. अशा वेळी ती तिचा तणाव व्यक्त करते आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांनाही तणावात आणते. अशाच प्रकारे जर कोणी तणावात नसूनही जर तणावाचा भाग बनत असेल तर तिला सेकंड हँड स्ट्रेस म्हटलं जातं.

मानसिक तणाव शरीर आणि मन अशा दोन्हींवर प्रभाव टाकत असतो. यामुळं शारीरिक आणि मानसिक आजार बळावतात. तणावापासून दूर राहणं काहींना जमत नाही. अशात परिस्थिती अजून बिघडू शकते. यासाठी सेकंड हँड स्ट्रेसची लक्षणं आणि त्याचे संकेत काय आहेत याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. यामुळं ती व्यक्ती तिचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकते.

सेकंड हँड स्ट्रेसची लक्षण किंवा संकेत

1) विनाकारण तणावात राहणं – अनेकदा असंही होतं की, तणावात राहणाऱ्या व्यक्तीलाच त्याच्या तणावाचं कारण माहित नसतं. याचं कारण म्हणजे त्यांचा सेकंड हँड स्ट्रेस. कारण तणाव थेट त्यांच्या मनातून आलेला नसतो. त्यामुळं तणाव का जाणवत आहे हेच त्यांना कळत नाही. परिणामी त्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. अशा माणसाचं मनही कशात लागत नाही.

2) निराशावादी आणि भ्रमिष्ट – जर एखादी व्यक्ती कायमच पॉझिटीव्ह थिंकिंग करत असेल आणि आशावादी असेल, परंतु जर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळं जर तिला निराशा वाटत असेल तर समजून जा की, ती व्यक्ती सेकंड हँड स्ट्रेसची शिकार झाली आहे.

3) नेहमी थकवा जाणवणे – जर एखादी व्यक्ती आनंदी असेल पंरतु कायमच अशा लोकांमध्ये वावरत असेल जी तणावात आहेत तर अशा वेळी त्या व्यक्तीमधील ऊर्जा प्रभावित होते. याशिवाय आरोग्यवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून नकारात्मक लोकांपासून दूर राहायला हवं.

4) ब्रेन फॉगचे शिकार -जर तुम्ही विसरायला लागला असाल किंवा स्मरणशक्ती कमजोर होऊ लागली असेल तर तुम्ही ब्रेन फॉग या आजाराला बळी पडत आहात असा त्याचा अर्थ आहे. या आजारात विचार करण्याची क्षमता प्रभावित होते आणि व्यक्ती कायमच गोंधळेला असतो. तणाव आणि औदासिन्य हे स्मरणशक्तीवर प्रभाव टाकत असतात.

5) योग्य विचार आमि निर्णय करण्यात असमर्थता – जर कामाच्या बाबतीत विचार करताना किंवा निर्णय घेताना कठिण होत असेल तर सेकंड हँड स्ट्रेसचं लक्षण असू शकतं. सेकंड हँड स्ट्रेस व्यक्तीच्या उत्पादकतेला प्रभावित करू शकतो. अशात आपलं काम करतानाही आनंद मिळत नाही आणि ते करणं कठिण देखील होतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.