सोनू सूदच्या ‘या’ गोष्टीमुळं नाराज होती पत्नी सोनाली ! 1 पंजाबी मुलगा तेलगू मुलीच्या प्रेमात कसा पडला ? जाणून घ्या ‘Love story’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. आज आपण सोनूची पर्सनल लाईफ आणि लाईमलाईटपासून दूर असणाऱ्या त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत. सोनाली असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.

sonu sood 2
File Photo

कॉलेजमध्ये झाली होती भेट
1990 सालची ही गोष्ट आहे. तेव्हा सोनूनं फिल्मी करिअरला सुरुवात केली नव्हती. सोनू नागपूरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरींगमध्ये शिक्षण घेत होता. याच वेळी त्याची ओळख नागपूरमध्येच एमबीए करणाऱ्या तेलगू मुलगी सोनाली सोबत झाली. 25 सप्टेंबर 1996 रोजी सोनूच्या आयुष्यात येणारी ही पहिली आणि शेवटची मुलगी ठरली आणि त्याची पत्नी झाली. एका मुलाखतीत सोनूनं सांगितलं होतं की, सिनेमात जाण्याच्या त्याच्या निर्णयानं सोनाली खुश नव्हती. परंतु तरीही तिनं प्रत्येक पावलावर त्याला साथ दिली आणि त्याला सपोर्ट केला.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात सोनालीनं केला सपोर्ट
सोनू लग्नानंतर सोनालीसह मुंबईतला शिफ्ट झाला होता. स्ट्रगल करणाऱ्या इतर तीन कलाकारांसोबत त्यांनं एक रूमचा फ्लॅट शेअर केला. एका मुलाखतीत बोलताना सोनूनं सांगितलं होतं की, त्याच्या पत्नीनं कधीच याबद्दल तक्रार केली नाही. सोनाली सोनूसोबत अनेक पार्टी आणि इवेंटमध्ये दिसत असते. परंतु ती कायमच लाईमलाईटपासून दूर असते. सोनू आणि सोनाली यांना दोन मुलं आहेत. ईशान आणि अयान अशी त्यांची नावं आहेत.