‘क्रिमीनल लॉयर’ बासुंरी कौशल ही सुषमा स्वराज यांची एकुलती एक ‘लेक’, जोडलं होतं ‘या’ प्रकरणाशी ‘कनेक्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि धाडसी राजकारणी म्हणून त्या परिचित होत्या. सुषमा स्वराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पुर्णवेळ परराष्ट्र मंत्री राहिल्या. काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय नम्र आणि सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये लोकप्रिय असलेला हा चेहरा भारतातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील.

१९७५ मध्ये त्यांचे स्वराज कौशल यांच्याशी लग्न झाले. सुप्रीम कोर्टात वकील असलेल्या स्वराज कौशल आणि  सुषमा स्वराज यांनी प्रेमविवाह केला होता.  सुषमा स्वराज यांना एक मुलगी असून बांसुरी कौशल असे तिचे नाव आहे.

 काय करते सुषमा स्वराज यांची मुलगी

 १) बांसुरी कौशल हि सुषमा स्वराज यांची एकुलती एक मुलगी असून तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्याचबरोबर तिने वकिली पूर्ण केली असून ती सध्या  क्रिमिनल लॉयर आहे. बांसुरी कौशल सध्या दिल्ली हायकोर्ट आणि भारताच्या सुप्रीम कोर्टात  क्रिमिनल लॉयर आहे.

२) ज्यावेळी आयपीएलचे माजी चेयरमन ललित मोदी यांच्या  कायदेशीर टीममध्ये सामील होत्या, अशी माहिती समोर आल्यानंतर बांसुरी कौशल या सुरुवातीला माध्यमांमध्ये प्रकाशझोतात आली होती.

३) ललित मोदी यांनी एका ट्विटमध्ये आपल्या लीगल टीमचे अभिनंदन केले होते. त्यामध्ये बांसुरी कौशल यांच्यासह ८ वकिलांचा देखील समावेश होता. यामध्ये  महमूद अब्दी, बांसुरी स्वराज, रोजर ग्रेसन, डॉ.आर.मराठा, बियांका हेमरिच, वेंकटेश दोंद, अभिषेक सिंह, अंकुर चावला या नावांचा समावेश होता.

४) २७ ऑगस्ट २०१४ रोजी  हायकोर्टाने ललित मोदी याचा पासपोर्ट परत दिल्यानंतर यावेळी बांसुरी   न्यायालयात उपस्थित होती. त्यानंतर ललित मोदीने आपल्या लीगल टीमचे अभिनंदन केले होते.

५) यावेळी आपल्या मुलीचा बचाव करताना सुषमा स्वराज यांनी तो तिचा पेशा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तिला त्या कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.

कोण आहेत स्वराज यांचे पती

स्वराज कौशल असं सुषमा स्वराज यांच्या नवऱ्याचं नाव होतं. कॉलेजमध्ये असताना दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं. १३ जुलै १९७५ ला त्यांचा विवाह झाला. पती स्वराज कौशल हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रसिद्ध वकिल होते. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांना देशातील सर्वात तरुण अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. स्वराज कौशल वयाच्या ३७ व्या वर्षी मिझोरमचे राज्यपाल देखील झाले.

सुषमा स्वराज यांचे कुटुंब

सुषमा स्वराज यांच्या  परिवारात एक भाऊ, एक बहीण आणि त्यांना एक मुलगी आहे. सुषमा स्वराज यांच्या वडिलांचे नाव हरदेव शर्मा तर आईचे नाव  लक्ष्मी देवी होते. भावाचे नाव गुलशन शर्मा तर बहिणीचे नाव वंदना शर्मा  आहे.

आरोग्यविषयक वृत्त –