तुमचं SBI मध्ये अकाऊंट असेल तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक खाती उघडण्याचा पर्याय देते. एसबीआयच्या बचत खात्यामध्ये तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकर्निंग डिपॉझिट (RD) च्या माध्यमातून बचत करू शकता. नुकतेच एसबीआयने बचत खाते 1 लाख रुपयांप्रेक्षा कमी ठेवण्याने व्याज दर कमी करून 3.25 टक्के केले आहे. एसबीआयचा हा नियमही 1 नोव्हेंबरपासून अंमलात आला आहे.

एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात दरमहा किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. एसबीआय खात्यात किमान शिल्लक संबंधित हा नियम प्रत्येक शहरात वेगळा आहे. आज आम्ही त्याबद्दल माहिती देणार आहोत.

जर तुमचे खाते मेट्रो सिटीमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या एसबीआय खात्यात दरमहा किमान 3,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे. निम -शहरी भागातील खात्यात सरासरी किमान शिल्लक 2 हजार रुपये असावे. ग्रामीण भागात एसबीआय खात्यांसाठी ही मर्यादा 1000 रुपये आहे. आपण जर आपल्या एसबीआय खात्यात सरासरी किमान शिल्लक ठेवली नसेल तर यासाठी आपल्याला 10 ते 15 रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागेल. हा शुल्क मेट्रो सिटी आणि इतर शहरी भागातील शाखांसाठी आहे.

त्याचबरोबर निम -शहरीसाठी हा दंड 7.5 ते 12 रुपये आणि जीएसटी एवढा आहे.ग्रामीण भागाच्या एसबीआय खात्यात किमान रक्कम नसल्यास 5 ते 10 रुपयांचा दंड आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल.

SBI तीन पटीपेक्षा जास्त नफा कमावते

30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत एसबीआयचा निव्वळ नफा तीन पटीपेक्षा अधिक होता. जास्त व्याजदराच्या उत्पन्नासह इतर कमाई यांमुळे बँकेला नफा झाला आहे. बँकेचा एकूण नफा 3011.73 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात तो 944.87 कोटी होता.

Visit : Policenama.com