खुशखबर ! आता घरबसल्या पहा सिनेमाचा ‘फस्ट डे फस्ट’ शो, 5 सप्टेंबरला ‘JIO FIBER’ लॉन्च होणार, जाणून घ्या सर्व ‘खास’ प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात सध्या इंटरनेट उपलब्ध करुन देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, त्यात ब्राडबॅन्ड क्षेत्रात नॅशनल आणि स्थानिक अशा अनेक कंपन्यांच्या समावेश होतो. परंतू या सर्व कंपन्यांना धासती आहे ती जिओ गिगा फायबरची. याचा रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने ग्राहकांना एक नवीन गिफ्ट दिले आहे. आता तुम्ही घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने व्हिडिओ कॉल करु शकतात. यासाठी सेट टॉप बॉक्सला गिगा फायबर नेटवर्कने जोडावे लागेल. कंपनी उपलब्ध करुन देत असलेली ही सुविधा म्हणजे डिजिटल युगातील एक क्रांती समजली जात आहे. या संबंधित माहिती देताना कंपनीने आपल्या एजीएममध्ये उपलब्ध करुन देत असलेल्या सुविधांची माहिती दिली आहे.

या आहेत मोठ्या घोषणा
१. जिओ प्रीमियमचे ग्राहक रिलीज झाल्यानंतर लगेलच सिनेमा पाहू शकतात.
२. याशिवाय कंपनी जिओ पोस्ट पेड प्लस सेवा देखील लॉन्च केली आहे.
३. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड १४ टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आहेत.
४. जिओ फायबरचे वार्षिक पॅक घेतल्यास HD TV ची सेवा मिळेल.
५. जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून सुरु होईल.
६. जिओ फायबरच्या प्लॅनमध्ये १०० Mbps ने सुरु होईल.

५ सप्टेंबरपासून सुरु होणार जिओ फायबर सर्विस
जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. याचे प्लॅन १०० Mbps पासून सुरु होतील. हा स्पीड बेसिक प्लॅनसाठी असेल. प्लॅननुसार हा स्पीड १ Gbps जाईल. यात सर्व वाइस कॉल फ्री असणार आहे. जिओ फायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून सुरु होईल. अनलिमि़डेट इंटरनॅशनल कॉलिंगचा प्लॅन ५०० रुपयांपासून सुरु होईल.

जिओ हॉलोबोर्ड MR हेडसेट
शॉपिंगसाठी रिलासन्सने एक विशेष ऑग्मेंटेज रिअ‍ॅलिटी डिवाइस MR हेडसेट सादर केला आहे. यामाध्यामतून तुम्ही गारमेंट ३६० डिग्रीमध्ये पाहून शकतात. यामुळे तुमची शॉपिंग सहज होऊन जाईल. या डिवायसच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाचा नवा अनुभव घेऊ शकतात. यामाध्यमातून तुम्ही अंतराळ, चंद्रयानच्या माध्यमातून अभ्यास करु शकतात. यातून तुम्ही सिनेमा पाहण्याचा देखील चांगला अनुभव घेऊ शकतात. यातून तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्या सारखा अनुभव मिळेल.

स्टार्टअपसाठी घोषणा
जिओ संपूर्ण देशात वर्ल्ड क्लास डेटा सेंटर स्थापित करणार आहे. स्टार्टअपसाठी जिओने मोठी घोषणा केली आहे. आता जिओ कनेक्टिविटी आणि क्लाऊड सेवा मोफत देणार आहे. ही सेवा स्टार्टअपला १ जानेवारी २०२० पासून मिळेल. जिओ त्या सर्व स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करेल, जे देशात डिजिटल क्रांती, मायक्रो अॅण्ड स्मॉल बिजनेस, कृषि उद्योग,ऑटोमेशन क्षेत्रात काम करतील. ज्याच्या काही खास कल्पना असतील आणि जे स्टार्टअप देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. मायक्रोसॉफ्टने रिलायन्सबरोबर क्लाऊड इंफ्राचा करार केला आहे. यामुळे जिओ आता ही सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

जिओ 5 जी नेटवर्क रेडी
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ 5 जी नेटवर्क रेडी आहे, तर वायरलेस नेटवर्क ४ जी ला ५ जी मध्ये बदलण्यात येई. त्यांच्या मते जिओ होम ब्रॉडबॅड सेवा, इंटरप्राइस सेवा, ब्रॉ़डबॅड फार एसएमई हे या वर्षात सुरु करणार आहेत. येणाऱ्या काळात घराघरात कनेक्टेड डिवाइस असतील. याशिवाय २ अरब आयओटी डिवाइस असतील. जिओ गीगाफायबरसाठी १.५ कोटी नोंदणी १६०० शहरात झाली आहे. कंपनी आता ब्रॉडबँडची सेवा वाढवणार आहे. ५ लाख घरात फायबर ब्रॉडबँडची सेवा देणात येत आहे, तेथे १०० जीबी महिन्याला उपयोग होत आहे. १ वर्षात गीगाफार सर्व देशात पसरेल.

सर्वात मोठी करदाता कंपनी
AGM मध्ये रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी सांगितले की पंतप्रधानांनी २०२० पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. मला वाटते, भारत हे लक्ष सहज साध्य करेल. ते म्हणाले की RIL सर्वात मोठी करदाता कंपनी आहे. मागील वित्त वर्षात कंपनीने ६७३२० कोटी रुपये GST दिला आहे तर १२१९१ कोटी आयकर स्वरुपात दिला आहे.

RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, त्यांची आई कोकिलाबेन अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी हे यंदाच्या AGM मध्ये उपस्थित आहेत.

आरोग्यविषयक वृत्त